ताज्या घडामोडी

पोलीस अधीक्षक सुनिल कडासने स्वतः दुचाकी चालवीत पोहोचले आदिवासी पाड्यात

चांदा ब्लास्ट :

बुलढाणा

बुलढाणा चे पोलीस अधीक्षक मा.सुनिल कडासने  यांनी शासकीय गाडीमध्ये प्रवास न करता आदिवासी समाजसेवक श्री. नामदेव भोसले यांच्या सोबत टु व्हिलर गाडीवर स्वतः गाडी चालवत तीन ते चार किमी डोंगरदऱ्यात जंगलातुन गाडी चालवत कार्यक्रमाच्या ठिकाणी आदिवासी पाड्यावर पोहचले.

आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले व पोलीस अधीक्षक मा. सुनिल कडासने साहेब यांनी पोलीस व आदिवासी यांच्यातील कलंकित दरी कमी करण्यासाठी “पोलीस भिती मुक्त पारधी व पारधी मुक्त पोलीस ” या कार्यक्रमाचे  आयोजन शेवराई सेवाभावी संस्थेने  केले होते. ” आपल्या प्रगतीसाठी आम्ही आलो चार पावुल पुढे, आता तुम्ही  दोन पाऊल पुढे या ” असे मत बुलढाणाचे पोलीस अधीक्षक कडासने यांनी   व्यक्त केले. अधीक्षक सुनिल कडासने साहेब पुढे म्हणाले की आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या कामाची दखल महाराष्ट्रनेच नव्हे तर संपूर्ण देशाने घेतली आहे, त्यांच्या पोलीस भिती मुक्त पारधी कार्यक्रमाचा फायदा समाजाला व शासकीय अधिकाऱ्यांना चागंला होत आहे. नामदेव भोसले यांनी महाराष्ट्रमध्ये हजारो आदिवाशी कुटुंबातील लोकांना गुन्हेगारीच्या कंलकीत जिवनातून बाहेर काढले आहे. त्यांना गावव्यवस्थेत मानसन्मान मिळाला आहे ,तसेच शेकडो आदिवासी, भटके, पिडीत, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांना गाव प्रवाहात आणून शासकीय सवलती मिळवून दिल्यामुळे अनेकांना न्याय मिळाला. भोसले यांच्या कामाला आपण सर्वजनांनी हातभार लावने ही काळाची गरज आहे असे पोलीस अधीक्षक कडासने म्हणाले. यावेळी आदिवासी पारधी समाजातील गुणवंत विध्यार्थी व वयोवृद्ध आदर्श माता पितांचा सन्मान पोलीस अधीक्षक सुनील कडासने व साहित्यिक नामदेव भोसले, मुक्तेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक सुनील कडासने उपस्थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक बि. बि. महामुनीम, जेष्ट विचारवंत मुक्तेश्वर कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधीक्षक हेमायु ठाकरे, तहसीलदार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश नायीकनवरे, सामाजिक कार्यकर्ता कुसमत पवार, एस बी भोसले, अजिनाथ डोंगरे, गौरव कु पवार, शिगारेट पवार, व खामगाव तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले.

,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये