ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत चोखामेळा जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

मृतकच्या भावाची तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यांतील खल्याळ गव्हाण शिवारात असलेल्या संत चोखामेळा जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या महेफुज शेख मुखतार (२०) याचा मृत्यू झाल्याची घटना २मे ला घडली.

दरम्यान मृतक चा भाऊ शेख सोहील शेख मुखतार रा खल्ल्याळ गव्हाण याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, माझ्या भावाला आरोपी कृष्णा भानुदास जोशी, देवानंद श्रीनिवास डोईफोडे, विनोद खंडुजी मांटे यांनी जलाशयात मोटार लोटायच्या कामासाठी नेले होते, त्याला पोहणे येत नसल्याचे माहीत असूनही त्याला पाण्यात उतरविले व पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला, त्याच्या मृत्यू ला कृष्णा भानुदास जोशी, देवानंद श्रीनिवास डोईफोडे,विनोद खंडूजी मांटे हे तिघेही कारणीभूत आहे, फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलिसांनी तिघाविरोधा त भा द वी कलम ३०४(A) ३४अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये