Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरात बत्तीस वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या 

चित्ते नगरातील घटना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 शहरातील चित्ते नगर येथे राहणाऱ्या 32 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक तीन ला उघडकीस आली याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला आहे

 सविस्तर वृत्त असे की फिर्यादी डॉक्टर पवन गिरी तर्फे रमेश बबनराव मुटकुळे कक्षसेवक ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील चित्ते नगर येथील मृतक दत्ता भास्कर शिंदे वय 32 वर्ष यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे त्यांना अत्यवस्थ अवस्थेमध्ये भरत आसाराम सवडे यांनी ग्रामीण रुग्णालय येथे आणले तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासणी अंति मृत घोषित केले, पोलीस स्टेशन एफ आय आर नुसार मृतकाने फाशी घेतली की,त्यांना दिली असा संशय व्यक्त केल्या जात आहे सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये