ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अक्षय भालेरावच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या – वंचितची मागणी

अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा भव्य धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट

नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या गावातील अक्षय भालेराव या तरुणांची निर्घृण हत्या करून खून करण्यात आला होता.त्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे आंदोलने होत आहे. त्याच अनुषंगाने आज दि. १४ जून रोजी कुशल मेश्राम,राज्य कार्यकारणी सदस्य राजेश बोरकर जिल्हा प्रभारी, जयदीप खोब्रागडे, जिल्हा कार्याध्यक्ष,पुराणिक गोंगले, जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग,सोमाजी गोंडाने जिल्हाध्यक्ष पश्‍चिम विभाग. कविता गौरकार जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, तनुजा रायपुरे शहरध्यक्ष महिला आघाडी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा अधिकारी  कार्यालय समोर घरणे आंदोलन   वंचित बहुजन आघाडी  कार्यकर्त्यांच्या उपस्थिती होते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राज्यपाल यांना निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अक्षय भालेराव या तरुणांनी आयोजित करून भव्य दिव्य स्वरूपातचे धरणे आंदोलन करण्यात आले त्याचाच राग म्हणून काही समाजकंटकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का काढली म्हणून त्याचा बदला घेत एका कार्यक्रमांमध्ये तिडके या परिवारासह अनेकांनी त्याच्यावर हमला चडवून चाकू तलवारीनी वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलने होत आहेत त्याच धर्तीवर चंद्रपूर मध्ये सुद्धा यांच्या वंचित बहुजन आघाडीचे तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून मोर्चा रुपी धरणेआंदोलन केले.अक्षय भालेराव यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या प्रमुख मागणीसह अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आर्थिक मदत, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी, तसेच या कुटुंबाचे आणि या घटनेतील साक्षीदारांचे संरक्षण करणे. सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून सहा महिन्याच्या आत न्याय देणे, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करणे सोबतच अक्षय भालेराव यांच्या विरुद्ध कटकारस्थान रचणार्‍या तसेच यांची निर्गुण हत्या करणार्‍या आरोपींची मालमत्ता जप्त करणे ट्रॉसिटी क्ट कायद्याची कठोर अंमलबजावणी करून यांना फाशीची शिक्षा देणे.गावात अल्पसंख्यांक असणार्‍या बौद्ध समाजाला आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवानगी देणे आरोपींना पाठीशी घालणार्‍या लोकांवर ३०२ व ट्रॉसिटी क्ट अंतर्गत सह आरोपी करणे अशा विविध मागण्या घेऊन आज समस्त बौद्ध बांधव आणि बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला.तर
धरणे आंदोलनाचे प्रस्ताविक मधुभाऊ वानखेडे यानी केले तर संचालन सुभाषचंद्र ढोलने यानी केले. आभार हर्षवर्धन कोठारकार यानी मानले. यावेळी मधुकर उराडे, शैलेंद्र बारसागडे,नागेश पथाडे,मुधुभाऊ चुनारकर, उमेश कडू, संध्या पेटकर, किशोर रायपुरे, दिव्यकुमार बोरकर,रुपचंद निमगडे,प्रदीप झामरे, रुपेश निमसरकार, दिलीप गेडाम, बाळासाहेब बनसोड,राजेश दोडीवर, प्रेमलाल मेश्राम, धीरज तेलंग, रवी तेलसे, विशेष निमगडे,मधुकर गेडाम, सुभाष थोरात,बबिता वाघमारे, लताताई साव, राखी रामटेके, लीना रामटेके, विशेष निमगडे, छोटू दहेकार, कृष्णाक पेरकावार, अशोक पेरकावार,खेमदेव गेडाम, मुकेश बनसोड, विशाल कांबळे, सुनील खोब्रागडे, राहुल चौधरी,संजय गेडाम,कृष्णदास मेश्राम, राजू अलोणे, धर्मवीर गराडकर, रवींद्र शेंडे, सुमित मेश्राम, राहुल गौरकर,राजू जुलमे, प्रदीप झामरे, प्रियांकेश शिंगाडे, संदीप देव, तेजराज भगत, धर्मेंद्र गायकवाड, धम्मदीप वाळके, प्रदीप पाटील,प्रभुदास देवगडे, अक्षय लोहकरे,चंदन उंचेकर, विपीन रामटेके, प्रवीण जाणगे, विकी खाडे, मधुकर गेडाम, प्रकाश तोहोगावकर, विजय जीवणे, अविनता उके, सुलभा चांदेकर,श्रुती दुर्गे, राजूभाऊ कीर्तक, सोनल वाळके,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
१) नांदेड जिल्ह्यातील बोधार हवेली या गावात अक्षय भालेराव या तरूणांच्या हत्यारांना फासी ची शिक्षा देण्यात यावी.
२) रेणापुर व मुंबई प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
३) चंद्रपूरात अवैध सावकारी करणार्या. व नियमबाह्य व्याज घेऊन जनतेची लुट करणार्या सावकारावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडुन करण्यात आली.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये