ताज्या घडामोडी

शेतात विष प्राशन करून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील झालीगुडा येथील एका युवा शेतकऱ्यांने डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व तो फेडण्याचा एकमेव मार्ग असलेल्या शेतीचे निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान याला कंटाळून विषारी द्रव प्राशन करून स्वतःचे शेतामध्ये जीवन संपविले. विनोद लक्ष्मण होडबे वय (३१) असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे.

या वर्षीच्या सततच्या पावसामुळे त्याला आर्थिक नुकसानीचा फटका बसला असून,खरीप हंगामातील पीक हातचे गेल्याने आता बँकेचे व इतर कर्ज फेडायचे कसे हा मोठा प्रश्न उभा झाला, अश्या चिंतेतून विनोद होडबे या युवा शेतकऱ्यांने आपल्या जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात कुटुंबात म्हातारे आई-वडील, बहीण असा आप्त परिवार आहे.

◆ प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज –

संपूर्ण तालुका सततच्या होणाऱ्या आत्महत्यामुळे होरपळून गेला आहे. अश्यातच बुधवारी तालुक्यातील झालीगुडा येथे एका युवा शेतकऱ्यांने आत्महत्या केली. आत्महत्येने झालीगुडा गावावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही,यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये