ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे जेवरा येथील अनेक घरांचे उडाले छते – टीन

घराच्या भिंती, इलेक्ट्रिक पोल पडून मोठ्या प्रमाणात नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

शासनाने त्वरित मदत करावी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना यांची मागणी 

कोरपना तालुक्यातील जेवरा येथे दि ७/५/२०२४ रोज मंगळवार दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान हवा धुंद,मेघगर्जनेसह पाऊस आला हवा धुंद व गारां सह अवकाळी पावसामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले टीन,कवेलु,भिंती, इलेक्ट्रिक पोल पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र जिवीत हानी झाली नाही.
परंतु या मध्ये दोन महिला सौ किरण विठ्ठल गेडाम, निताबाई सुधाकर भोयर गंभीर रित्या जखमी झाल्या आहे त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्या गंभीर रित्या जखमी झाल्या आहे व त्यांचा डोक्याला पाच सहा टाके बसलेले आहे तसेच तालुक्यातील अनेक गावांतील घरांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आहे नागरिकांच्या घरांचे पंचनामे तहसीलदार साहेबांनी जातिने लक्ष देऊन पंचनामे करून शासनाच्या वतीने त्वरित मदत देण्यात यावी अशी मागणी नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना तसेच भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावेळी गावातील नागरिक बंडु गोंडे,शेख मोहम्मद भाई,आशिक शेख,मेघेशाम गोंडे,मनोज गोंडे,विठ्ठल गेडाम,सुधाकर भोयर आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्ये,नागरिक,महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये