ताज्या घडामोडी

शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.उच्च प्राथमिक आदर्श शाळा चिखली बु येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा चिखली बु पंचायत समिती जिवती या शाळेतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आठ पैकी सात विद्यार्थी पात्र झाले आहे जि.प. उच्च प्राथमिक शाळा चिखली बु ही तालुक्यातून आदर्श शाळा असून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत असते यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे तर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत परीक्षेत सात विद्यार्थी सात विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत यामध्ये आयुष राठोड बालवीर राठोड हुसेन सुरपाम साई करपते श्रेया आत्राम अविनाश कोरांगे नव्या राठोड या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

 विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक वामन चव्हाण मुख्याध्यापक राजकुमार मुन उद्धव पवार सर वंदना बोबडे मॅडम मेघा भजने मॅडम निखत खान मॅडम व आपल्या आईवडिलांना दिले आहे या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती चिखली बु पालक वृंद केंद्रप्रमुख साधना धांडे मॅडम गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी साहेब यांचेकडून कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये