गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या देशी दारूचा साठा बाळगून विक्रीचा एकूण १ लाख ३३ हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 08/05/2024 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, अनंता गणपतराव नागपुरे रा.वायगांव निपाणी हा त्याच्या घरी अवैधरित्या देशी दारूचा साठा बाळगून त्याची विक्री करीत आहे. अशा माहितीवरून त्याचेवर दारूबंदी प्रो. रेड केला असता आरोपी नामे अनंता गणपतराव नागपुरे वय 44 वर्ष रा. वायगांव निपाणी,जि.वर्धा ह्याचे ताब्यातून देशी दारू असा एकूण 1,33,600/- रुपयेचा माल जप्त केला.

सदर देशी दारू चा माल गजु पाटणकर रा. देवळी यांनी त्यांचे आणून दिल्याचे सांगितल्याने दोन्हीही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस अंमलदार हमीद शेख, श्रीकांत खडसे,सचिन इंगोले, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, प्रदीप वाघ अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये