ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे योग्य आहारविषयक सवयींबद्दल कार्यशाळेचे आयोजन..

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे पर्यवेक्षक महेश गौरकार व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथे दि. 21/12/2023 रोजी वर्ग सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहारविषयक सवयींबद्दल मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून इको-प्रो संस्थाचे संस्थापक बंडू धोतरे, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे, प्राचार्या आम्रपाली पडोळे उपस्थित होत्या.

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य आहार-विहार, योग्य आचार आणि उत्तम विचार आवश्यक आहे. अन्न आणि आहार तसे जुनेच पण अत्यंत महत्त्वाचे विषय आहे. म्हणूनच सुदृढ, निरोगी राहण्यासाठी काय खावे, केव्हा खावे, किती खावे असे असंख्य प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात. अन्न हे फार प्रभावशाली अस्त्र निसर्गाने आपल्या हाती दिले आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. म्हणूनच येणारी युवापिढी ही सुदृढ व निरोगी व्हावी या करिता चांदा पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील प्रश्न विचारून मार्गदर्शक बंडू धोतरे यांच्याशी सुसंवाद साधला.

या प्रसंगी बंडू धोतरे यांनी विद्यार्थ्यांना जंक फूड च्या आहारी जाऊन आपले आरोग्य धोक्यात न घालता घरच्या अन्नाला प्राधान्य द्यावे तसेच पाणी पिण्याच्या योग्य वेळा पाळल्या तर आपण अनेक व्याधींना आपल्या शरीरापासून दूर ठेवू शकतो असा मोलाचा संदेश दिला.

या प्रसंगी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी आजच्या स्पर्धेच्या, ताण-तणावांच्या आणि प्रदूषणाच्या जगात आत्मविश्वासाने, उत्साहाने आगेकूच करायची असेल तर शरीर निरोगी ठेवावे लागेल. त्यासाठी संतुलित आहार व नियमित व्यायाम करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

शाळेच्या प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सुदृढ आहाराविषयीच्या सवयी लावण्या करिता प्रोत्साहित केले.

कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रम प्रमुख फहीम शेख तर आभार प्रदर्शन अंकीता रंजन या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे पर्यवेक्षक महेश गौरकार व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये