ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१९ महिन्याची सुर्वी साळवेची ‘इंडिया बुक ऑफ रेकार्ड’ मध्ये नोंद 

चांदा ब्लास्ट

घुग्घुसच्या रामनगर काॅलनीतील 19 महिन्याच्या सुर्वी पूजा समिन्द्र साळवे हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या बळावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मधे धडक देऊन ठसा उमटविला आहे. सुर्वी ने रेकार्डिंग इंग्लिश अल्फाबेट (२६), वाईल्ड ॲनिमल (९), फ्रुट (२०), डोमेस्टीक ॲनिमल (२०), बर्ड्स (१०), पार्ट ऑफ बॉडी (१३) अशा ९८ वस्तूंना विहित वेळेत ओळखून आपल्या बुद्धिमत्तेचा परिचय ‘इंडिया बुक ऑफ रेकार्ड’ च्या अधिकाऱ्यांना करवून देऊन आपले नाव रेकॉर्ड मधे सामिल करविले. तिची निवड झाल्यानंतर तिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

घुग्घुसच्या रामनगर काॅलनीमध्ये राहणारी सुर्वी पूजा समिन्द्र साळवे हिचे वडील कोल इंडिया कंपनीमध्ये लिपिक पदावर कार्यरत आहेत. सुर्वीचा जन्म २३ जून २०२२ ला झाला. लहानपणापासूनच सुर्वी तल्लख बुद्धीची असल्याने कोणतीही गोष्ट ती लक्षात ठेवते. घरातील पुस्तके आणि टिव्ही पाहून प्रत्येक गोष्ट लवकरच आत्मसात करण्याचे प्रयत्न करत असते. तेव्हापासून तिची अभिरूची घरच्यांना समजली व त्यांनी सुरुवातीला पुस्तकीय अभ्यास करून अधिकाधिक प्रमाणात सुर्वी कशी पारंगत होऊ शकते याकडे लक्ष दिले. सुरवीची आई पुजा साळवे यांनी तिचा सतत सराव करून घेतला आणि स्पर्धेची माहिती घेऊन नोंदणी केली.

२० फेब्रुवारीला तिची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकार्ड’ मध्ये झाली असून १५ मार्च २०२४ ला प्रमाणपत्रासह नामांकन मिळाले. ‘इंडिया बुक ऑफ रेकार्ड २०२४’ मधील पुस्तक सुरवीच्या उपक्रमाची नोंद घेईल. पुढील स्पर्धेसाठीदेखील तिला प्रोत्साहन देण्याची कुटुंबियांनी तयारी दर्शविली असुन ह्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये