गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगाव शहरातील तांदळाचे गोडावूनवर पोलिसांचा छापा

एकुण ४५ लाख ८६ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरातील तांदळाचे गोडावूनवर पोलीस अधिक्षक वर्धा यांचे विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचा छापा, एकुण 45,86,790/- रु चा मुद्देमाल जप्त दिनांक 17/08/2023 रोजी संध्याकाळी वर्धा पोलीसांचे विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ये चमुने पुलगाव येथील महेश शामलाल अग्रवाल यांचे गोडावून वर छापा मारला असता

1) ट्रक क्र. सी.जी. 08 ए. एच. 6664 क्रमांकाचा ट्रक चालक – कोमलकुमार हरीराम साहु वय 33 वर्षे रा. रामपूर थानाचौकी चिंचोला तह छरीया जि. राजनांदगाव, छत्तीसगड ट्रक मालक डोगरगड, छत्तीसगड येथील अनुपसिंग – भाटीया ट्रक किमत 10,00,000/- रु ट्रक मध्ये तांदुळ 31540 किलो

2) ट्रक क्र एम.एच. 30 ए. व्हि. 0420 ट्रक चालक – नरेश चंपतराव आंबेकर वय 43 वर्षे रा. शांतीनगर वर्धा, ट्रक मालक आशिष उल्हासराव चोरे रात्र वर्धा ट्रक किंमत 10,00,000/- रु ट्रक मध्ये तांदुळ 25720 किलो 3) ट्रक क्र सी.जी. 08 ए.ई. 5411 ट्रक चालक- किशोर कोडु चौधरी वय 35 वर्षे रा. राजोली तह. अर्जुनी मोरगांव जि.. गोदीया, ट्रक मालक कुलदिपसिंग चरनजितसिंग भाटीया रा. राजनांदगाव तह. जि. राजनांदगाव (छत्तीसगड) – ट्रक किंमत 10,00,000/-रु ट्रक मध्ये तांदुळ 30895 किलो

एकुण 15,86,790/- रु चा 88,155 किलो तांदुळ व 30,00,000/- रू चे तिन ट्रक एकुण किंमत 45,86,790 /- रु चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री नुरूल हसन, मा. अतिरीक्त पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पवार सा तसेच मा. पोलीस निरीक्षक स्थागुशा वर्धा श्री. गायकवाड सा. यांचे मार्गदर्शनात सपोनि संदीप गाडे, पोहवा रोशन निगोळकर, नापोका सागर भोसले पोअ. अभिजीत गावडे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, प्रशांत आमनेरकर यांनी केली असुन पोलीस स्टेशन पुलगाव येथे जिवनावश्यक वस्तु अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये