Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगरातील पाणी पुरवठा सुरळीत करा

महानगर भाजपाचे मनपाला निवेदन ; भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडेंच्या नेतृत्वात चर्चा

चांदा ब्लास्ट

महानगरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यथाशिघ्र सोडविण्यात यावा यासाठी महानगर भाजपा पुढे सरसावली आहे. प्रभागामध्ये व विविध ठिकाणी अमृत योजना पूर्ण झाली असतांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत असल्याचा मोठया प्रमाणात पाणीपुरवठा नियमित होत नाही अशा तक्रारी महानगर भाजपाला प्राप्त होत आहे. त्या ठिकाणी मागणी बघता पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात होत नाही अशा सुद्धा तक्रारी प्राप्त होताना दिसून आले आहे.विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला निवेदन देऊन मंगळवारी(7मे)मनपा सभागृहात पाण्याच्या प्रश्नावर चर्चा केली.
यावेळी माजी नगरसेवक रामपाल सिंग,सविता कांबळे,शीला चव्हाण,देवानंद वाढई, राहुल घोटेकर,प्रदीप किरमे ,माया उईके,शीतल गुरनुले,पुष्पा उराडे, कल्पना बाबुलकर,ज्योती गेडाम,चंद्रकला सोयाम,शीतल अत्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी राहुल पावडे म्हणाले, ज्या ठिकाणी अमृत योजना काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी सुद्धा पाणी कमी प्रमाणात येत असल्याचे वारंवार नागरिकांकडून तक्रारी येत आहे. प्रभागात व शहरात  नळ योजने अंर्तगत नवीन नळ कनेक्शन तातडीने पूर्ण करावे. तसेच ज्या ठिकाणी पाण्याची स्थिती चिंता जनक आहे, त्या ठिकाणी तातडीने बोरिंगची व्यवस्था करण्यात यावी, टैंकर ची संख्या वाढविण्यात यावी व सर्वत्र ते जलदगतिने क्षेत्रात पुरविण्यात यावे, तसेच सिंन्टेक्स ची सुध्दा आवश्यक त्या ठिकाणी संख्या वाढवुन शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यात पूर्ण झालेले असून ज्या क्षेत्रात पाणी सुरू नाही ते लवकर करण्यात यावे .अशी मागणी त्यांनी केली.यावेळी मनपा प्रशासनातर्फे अतिरिक्तआयुक्त व इतर अधीकारी उपस्थित होते.
विविध मुद्यांवर झाली चर्चा
चंद्रपूर:- मनपाच्या सभागृहात झालेल्या चर्चेत सध्याची पाणी पुरवठा त्यात कमतरता कारण व सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपाय.अमृत योजना सुरू असलेले क्षेत्र व त्यात असलेली कमतरता, पाणी पुरवठा व सुधारणा. सध्याची बोरींग स्थिती शहरात किती व दुरूस्ती करणारी यंत्रणा. नविन बोरिंग टंचाईच्या भागात देण्याची कार्यवाही व सध्या काय करता येणार. सिंन्टेक्स स्थिती व भरण्याची यंत्रणा. सध्याचे टँकर उपलब्धता रेगुलर टैंकर किती.
अमृत नळ योजना मधील ज्या प्रभागात काम पूर्ण झालेले असुन सुध्दा पाणी चालु झाले नाही. (भाग किती व कारण) प्रभागातील जनतेच्या तक्रारी वरून नळाचे पाणी येत नाही, परंतु नळाचे बिल जास्त येत आहे.पावसाळया आधी शहरातील BH मोठे नाले व नाल्यांची साफ सफाई मोहीम राबवीने करीता आढावा.अश्या एकूण 09  मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये