ताज्या घडामोडी

गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात युवकाने गमावला प्राण – दुसरा युवक अत्यवस्थ

हैद्राबाद येथे उपचार सुरू

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

बल्लारपूर शहरातील (बस्ती) भागात असलेल्या वेकोलीच्या दवाखान्याजवळ गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वारांचा अपघात झाला होता. ह्या अपघातात राजशेखर पेरका व प्रशांत आकुला हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवून गंभीर जखमी असलेल्या सरदार पटेल वॉर्डातील राजशेखर पेरका व प्रशांत आकुला ह्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल केले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने प्रशांत आकुला ह्याला चंद्रपूर येथे तर राजशेखर पेरका ह्याला नागपुर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र आज नागपुर येथे मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजशेखर पेराका ह्याला माघार घ्यावी लागली व मृत्यूने आपला पाश त्याच्याभोवती आवळला.

दुसरा युवक  आकुला हा चंद्रपूर च्या दवाखान्यात उपचार घेत होता मात्र प्रकृती अधिक गंभीर असल्याने कुटुंबीयांनी त्याला हैद्राबाद येथील यशोदा दवाखान्यात भरती केले आहे. राजशेखर पेरका याला दोन-तीन महिन्यात कॉलरी मध्ये नोकरी लागणार होती. त्याच्या एक भाऊ कोलकाता येथे कार्यरत असुन लहान भाऊ मायनिंग विषयात शिक्षण घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये