रेती उपसा करताना शासनाच्या नियमाची पायमल्ली
महसूल अधिकारी लक्ष देणार का?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्यातील १३ रेतीघाटातून रेतीचे उत्खनन करून त्याचा साठा विक्री करण्याचा कंत्राट श्री मनोजकुमार अग्रवाल नागपूर यांना झाला असून त्यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील रेती घाटातून रेतीचे उत्खनन करतांना शासकीय नियमांची ऐसी-तैसी करून वैनगंगा नदीपात्रातून यंत्राच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन सुरू केले आहे. ‘रेतीचे उत्खनन करण्याकरिता यांत्रिक साधनांचा वापर करता येणार नाही.
फक्त मजुरांद्वारेच उत्खनन करणेबंधनकारक राहील, असे न करता रेतीचे उत्खनन व वाहतूक केल्यास ते अवैध मानले जाऊन शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश, नियम, अटी व शर्ती आपणास बंधनकारक राहतील, तसेच कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास आपणास मंजूर केलेले रेती घाट रद्द करण्यात येईल. त्यावर आपली कोणतीही हुजर राहणार नाही किंवा परताव्याचीमागणी करता येणार नाही. असे मंजुरी आदेशात स्पष्ट नमुद असतांना नदी पात्रातून यंत्राच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन करण्यात येऊन शासकीय नियमांना तिलांजली देण्यात येत आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील अन्हेरनवरगाव (आवळी), पिंपळगाव (भो.) हळदा-१, हळदा-२, हळदा-३, बोदेगाब, रणमोचण, खरकाडा, आवळगाव, अन्हेरनवरगाव (भालेश्वर), अन्तेरनबरगाव चिखलधोकडा, कोलारी, चिचगाव अशा तेरा गावालगतच्या वैनगंगा नदी पात्रातील रेती पाटातून २ लक्ष २७ हजार १०४ ब्रास रेतीचे उत्खनन दिनांक १०/६/२०२५ पर्यंतच करावयाचे रेती कंत्राटदाराला निर्देश आहेत व रेतीसाठ्यातून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच रेतीची विक्री करावयाची आहे. हळदा लगतच्या वैनगंगा नदीपात्रातून कंत्राटदार जे.सी.बी. च पोकलन यंत्राच्या सहाय्याने रेतीचे उत्खन्न करीत असून महसूल अधिकान्यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेती कंत्राटदाराबर कारवाई करावी अशी पर्यावरण प्रेमी नागरिकांची मागणी आहे.