Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केसुर्ली गाव व शेत शिवारात दहशत पसरवणाऱ्या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करा

न. प. माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रफुल चटकी यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

                नगरपरिषद क्षेत्रात येत असलेल्या भद्रावती शहरापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या केसुर्ली गावातील परिसरात मागील काही दिवसापासून पट्टेदार वाघाने दहशत पसरविलेली आहे. त्यामुळे केसुर्ली गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्या दहशत पसरवणाऱ्या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नगरपरिषद भद्रावतीचे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रफुल चटकी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती यांचे कडे केली.

केसुर्ली गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे त्या गावातील नागरिक शेतीमध्ये कामासाठी जात असतात तसेच गावातील नागरिक मजुरीसाठी भद्रावती शहरात ये जा करतात. तसेच गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी भद्रावती शहरात येतात.

मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी त्या पट्टेदार वाघाने राजू खामकर यांच्या गायवर हल्ला केला होता. त्यात त्यांची गाय मरण पावली. गावातील व तिकडे येजा करणाऱ्या नागरिकांवर तो पट्टेदार वाघ हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर त्या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी भद्रावती नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रफुल चटके आणि केसुर्ली गावकरी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांच्याकडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये