ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपन्याचा भुषण बोबडे पीईटी (पेट)परीक्षा उत्तीर्ण

भावी अधिकारी होण्याची तयारी सुरु - त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतर्फे घेण्यात आलेल्या पीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये शिक्षक कॉलनी कोरपन्यातील भुषण वसंतराव बोबडे यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश मिळविले आहे.

भूषणने अर्थशास्त्र विषयात पीईटी परीक्षा उत्तीर्ण केली.पीएचडी प्रवेशासाठी प्रवेश चाचणी म्हणून पीईटी परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात आली होती. यामध्ये भूषणने यश संपादन केले आहे.तो बि.एड.पण असुन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग चे परिक्षानाही प्रविष्ठ झाला असुन भावी अधिकारी होन्याची तयारी सुरु आहे,त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भूषणने त्याचे यशाचे श्रेय आई- बाबा,नातेवाईक,मार्गदर्शक आणि मित्र परिवाराला दिले आहे. त्यांचे गुरुवर्य प्राचार्य संजय ठावरी सर, पोलिस निरीक्षक अनील देरकर, वर्ग मित्र नायब तहसीलदार प्रतीक बोरडे, सेल टैक्स इंस्पेक्टर निलेश मालेकर यांचे कडून अभिनंदन करण्यात आले आहे .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये