ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवा संकल्प अभियानातून महिनाभर जनसेवेचा जागर; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान; नियोजन बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत सेवा आणि जनकल्याणाचे उपक्रम पोहोचविण्यात येणार आहेत. अभियानाच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयात जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  यावेळी माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर जिल्हा महानगर प्रभारी अर्चना डेहनकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारिणी परिषद सदस्य तुषार सोम, उपाध्यक्ष बलराम डोडानी, महामंत्री रवींद्र गुरनुले, मनोज पाल, नामदेव डाहुले, श्याम कनकम, सविता दंढारे, विधानसभा प्रमुख दशरथसिंह ठाकूर, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, ज्येष्ठ नेते प्रकाश देवतळे, रघुवीर अहिर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, सुभाष आदमने, स्वप्नील डुकरे, सारिका संदूरकर, विनोद खेवले, आदींची उपस्थिती होती.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारे हे सेवा संकल्प अभियान केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता समाजातील विविध घटकांना जोडणारे आणि सेवाभावी कार्याला चालना देणारे ठरावे, यासाठी बैठकीत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. महिनाभर चालणाऱ्या या अभियानात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

    यामध्ये ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘स्वप्नांचा भारत’ या विषयावर चित्रकला व भाषण स्पर्धा, ‘नमो सेवा गाथा’ नाटक सादरीकरण, अंगणवाडी सेविकांचा सन्मान, विकासकामांची रील स्पर्धा, सेवा दीप यात्रा, सेवा सेतू अभियान, विकसित भारत संकल्प यात्रा यांसह विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

    यावेळी मार्गदर्शन करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विकासासोबतच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविणे ही भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियान हे जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करणारे ठरले पाहिजे.

    सेवा हीच संघटनेची खरी ताकद असून, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेणे, शासनाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि समाजोपयोगी कार्याला गती देणे आवश्यक आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात जनसेवेचा व्यापक उपक्रम उभा करण्याचा प्रयत्न राहील, असे यावेळी हंसराज अहिर यांनी सांगितले.

   ‘स्वप्नांचा भारत’ चित्रकला व भाषण स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि त्यांच्या भारताबाबतच्या अपेक्षांना व्यासपीठ मिळणार आहे. ‘नमो सेवा गाथा’ नाटकाच्या माध्यमातून सेवा आणि विकासाचा प्रवास जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांचा सन्मान करून महिला आणि बालविकास क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सेविकांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

     विकासकामांची रील स्पर्धा, सेवा दीप यात्रा आणि सेवा सेतू अभियानाच्या माध्यमातून आधुनिक माध्यमांचा वापर करून विकासकामे व जनसेवेचे उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. तसेच विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विकसित भारताचे स्वप्न आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे अभियान जनसेवेच्या माध्यमातून अधिक व्यापक करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत प्रत्येक उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन करण्यात आले.

   बैठकीला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवा संकल्प अभियानातील विविध उपक्रमांच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करून जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये