ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुरोडा गाव व परिसरात फिरत असलेल्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा

मनसे शहर अध्यक्ष युगल ठेंगे यांनी केली निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्याततील कुरोडा व इतर परिसरात एका पट्टेदार वाघाचे दर्शन कित्तेक शेतकरी व वाटसरूंना झाल्याचे बोलले जात आहे. ‘वाघ जंगल परिसरात व शेतकरी शेती परिसरात’ असला कि सगळे सोईस्कर असते. परंतु तशे न होता वाघ शेती परिसरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे. रात्री बे रात्री शेतीचे कामे करण्याकरता तसेच शेतात पंपाद्वारे पाणी सोडण्याकरिता शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. तसेच शेतातील पीक राखणीकरिता सुद्धा शेतीवर जाणे गरजेचे असतते. त्याच प्रमाणे भद्रावती शहाराकडून कडून गावाकडे जाणाऱ्यांना सुद्धा रात्री एकटाच प्रवास करावा लागतो. त्यात या परिसरात पट्टेदार वाघ फिरत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थाना सुद्धा शहरातील शाळेत जाणे वा येने करावे लागत असल्याने या पट्टेदार वाघाच्या भीतीने मुलांना शिक्षण घेणे सुध्दा कठीण झाले आहे. वन्य प्राण्यांकडुन होत असलेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असताना पट्टेदार वाघाचे दर्शन शहरात तसेच तालुक्यात होत आहे.

म्हणजे प्रशासन पुन्हा नव्यानं वाघाच्या हल्ल्याचे प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते आहे. अद्याप पर्यंत वाघाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. पुन्हा शेतकरी व इतर कुणावर हल्ला होण्या पूर्वी वाघाचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे. परिसरात वाघाला पकडावे व त्याला त्याचा नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे जेणे करून वाघाचे संगोपन पण होईल व बळीराजा सुद्धा सुखावेल अश्या प्रकारचे मनसे शहराध्यक्ष युगल ठेंगे यांनी निवेदन दिले आहे.

यावेळी उपस्थित कुरोडा सदस्य निलेश मेश्राम, आडे आणि इतर मनसैनिक उपथित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये