ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालय येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे जागतिक पर्यावरण दिन आज दिनांक 5 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या “पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास” या संकल्पनेला अनुसरून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालय परिसरात प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारची रोपे लावली आणि त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. यावेळी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना पर्यावरण जपण्याची शपथ देण्यात आली.

प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ एक दिवसापुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन केले. उपप्राचार्य प्रा. देवानंद नागरे यांनीही वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट करून प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी झाड लावून त्याची जबाबदारी घ्यावी, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल साळवे, प्रा. सचिन सोळंकी, डॉ. मनोज पटोकार, डॉ. उषा जायभाये, संतोष अंतरकर तसेच सय्यद असीम, अरबाज शेख, गबाजी लाड व रासयो विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होऊन पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक प्रेरणा मिळाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये