ताज्या घडामोडी

गरोदर मातेला पूर परिस्थितीत पोहोचविले सुरक्षित स्थळी

वैद्यकीय अधिकाऱ्यांची समयसूचकता

चांदा ब्लास्ट :

सावली(प्रा.शेखर प्यारमवार)
मागील आठवड्यात जिल्ह्यासह सावली तालुक्यात अति मुसळधार पाऊस सुरू होता.सगळीकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती,सावली तालुक्यातील पुरामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला होता. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली अंतर्गत असलेल्या हरंबा(उमरी)येथील महिला सौ.शिल्पा पिंटू गेडाम वय २२ हीची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिला लोंढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात आले.
पूर परिस्थिती बघता आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यमजलवार आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे सदर महिलेला भर पावसात पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या अगोदर सावली येथील ग्रामीण रुग्णालयात सुखरूप भरती करण्यात आले. सदर कार्याचे संपूर्ण परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
*लोंढोली येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात परिसरातील १४ गावांचा समावेश आहे.येथील संपूर्ण रुग्णाचा भार आणि कामाचा ताण एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पडत आहे. सदर आरोग्य केंद्रात दोन पदे मंजूर असून अनेक दिवसापासून एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे,यासाठी वारंवार जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मेल आणि व्हाट्सअप द्वारे निवेदन देण्यात आले आहे.*
*देवाजी बावणे*
*सामाजिक कार्यकर्ता,साखरी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये