ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मनपाचा काळाबाजार उघड – नालेसफाईच्या नावाने जनतेचा पैसा पाण्यात!
सर्व नाले पुनश्च सफाई करून घ्यावे. अन्यथा राकाँ करणार उग्र आंदोलन
चांदा ब्लास्ट
दि १८/०७/२०२३ ला चंद्रपूर महानगर पालीका शहरी भागात पहील्यांदाच पडलेल्या पावसात स्थीती अशी होती की नाल्याचे पाणी रस्त्यात, रस्त्याचे पाणी लोकांच्या घरात, व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि लहान मुले शाळेत अडकले. चंद्रपूर शहर महानगर पालीकेतील अधिकारी या अगोदर तेथील परिस्थिती पहायला आले नाही. प्रत्येक प्रभागातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे लोकांना घराच्या बाहेर निघता येत नव्हते. २०१२ च्या अगोदर नगर परिषद असतांना सुध्दा अशी परिस्थिती बघायला मिळाली नाही.
म्हणजे त्यापेक्षा नगरपरिषदच बरी होती असे जनतेचे मत आहे. कारण म.न.पा. येवढा अवाढव्य कर वसूल करीत असून सुध्दा स्वच्छतेच्या नावावर नागरीकांची फसवणूक करतांना दिसत आहे. ह्याचे कारण असे की काल जयंत टाकीज चौक, आदर्श पेट्रोल पंप, चंद्रपूर ट्रॉफिक ऑफिस परिसर, हींदी सिटी हायस्कुल, साईबाबा मंदिर जवळ, तुकूम परिसरातील मुख्य रस्ता ह्याच्या व्यतिरीक्त रहिवासी परिसरात तलावाचे स्वरुप निर्माण झाले. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे कंत्राट दाराने ह्या वर्षी नाले सफाई कुठेच केली नसल्याचे विदारक दृश्य दिसून येत आहे. ह्यावर लक्ष देणारे मनपाचे अधिकारी डोळे बंद करून मुंग गिळून बसलेले आहे. ह्यामुळे हे सर्व अधिकारी ह्या परिस्थितीला जबाबदार आहे.
सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी आव्हान केले होते की मुंबई मनपा येथील कोणत्याही प्रभागामध्ये रस्त्यावर पाणी साचल्यास त्या झोन च्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे पालकमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार ह्यांना विनंती आहे की एकुण सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. कारण हजारो लोकांच्या घरी पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाने पण पाण्याची तीव्रता पाहता तातडीने सर्व शाळांना सकाळी ११ वाजता सुट्टी जाहीर केली पाहिजे होती. परंतु प्रशासन व प्रशासनावर वचक कोणाचा नसल्यामुळे लहान मुलांना व त्यांच्या पालकांना जिव हातात घेऊन आपल्या पाल्यांना वाचविण्याकरीता घराबाहेर पडावे लागले. म्हणून ह्या सर्व परिस्थितीला जबाबदार असलेल्या नालेसफाई च्या कंत्राटदाराला ह्या आठवडयात सर्व मनपा क्षेत्रातील सर्व नाले पुनश्च सफाई करण्याचे आदेश देवून स्वच्छ करून घ्यावे. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस चंद्रपूर शहराच्या वतीने मनपा येथे उग्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर शहर जील्हाध्यक्ष राजीव कक्कड युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर विधानसभा अध्यक्ष सुनिल काळे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे महिला कार्याध्यक्ष चारुशिला बारसागडे, विनोद लभाने, संभाजी खेवले, नौशाद सिध्दीकी, कुमार पॉल, राहुल देवतळे, निसार शेख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देण्यात आला.