आमदार देवराव भोंगळे यांनी आरसीसीपीएल सिमेंट कंपनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
अखेर आमदारांच्या मध्यस्थीने बेमुदत आमरण उपोषण मागे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना:-आरसीसीपीएल सिमेंट कंपनी विरोधात परसोडा येथील कार्तिक गोनलावार यांनी शुक्रवार दिनांक १० पासून विविध मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. यावर रविवारी आमदार देवराव कंपनीच्या मॅनेजरसह बेरोजगारीच्या विषयावर रस्त्या विषयावर चांगले धारेवर धरले आणि सकारात्मक उत्तर कंपनीकडून देण्यात आले बेरोजगार स्थानिकांना रोजगार देण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगितलेभोंगळे यांनी सकारात्मक चर्चा होऊन तोडगा काढण्यात आल्याने आमदार देवराव भोंगळे यांच्यामध्ये मध्यस्थीतीने उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणाच्या माध्यमातून ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, प्रकल्पात येणारी सभोवतालची जमीन खरेदी करण्यात यावी, ब्लास्टिंग मायनिंगमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, दिव्यांग बंधूंना ३ हजार भत्ता देण्यात यावा, कामगारांची वेतन वाढ करावी, कोठोडा रायपूर रस्ता निर्मिती, दोन्ही ग्रामपंचायत मधील गावांना दत्तक गाव घोषित करणे, पशुवैद्यकीय डॉक्टर नियुक्त करणे आदी मागण्यासाठी उपोषण सुरू होते. यावर विषयवार विस्तृत चर्चा करून मागण्या वर तोडगा काढण्यात आला.
याप्रसंगी आमदार देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसीलदार ,भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे, पुरुषोत्तम भोंगळे शहराध्यक्ष अमोल आसेकर, अरुण मडावी, विजय रणदिवे,आशिष ताजने, ओम पवार, अबरार अली, दिनेश खडसे, तिरुपती कन्नाके,जगदीश पिंपळकर आरसीपीएल कंपनीचे प्रशासनाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.