ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खा.धानोरकर यांच्या हस्ते वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात गणपती बाप्पाची स्थापना

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते वरोरा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजा-अर्चा करून बाप्पाचे पूजन करण्यात आले.
या मंगलमय प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर उपस्थित होते, ज्यामुळे या सोहळ्याला कौटुंबिक आणि उत्साहाचे स्वरूप आले होते
.