जनसेवा केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या भाजपलाचं जनतेची पसंती ; आ. भोंगळे यांचे प्रतिपादन
कवठाळा येथे शेतकरी संघटना, कॉंग्रेस व शिवसेना (उबाठा) च्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी ह्या आपल्या मानून त्यांच्या निराकरणासाठी भाजपमध्ये बुथ प्रमुखांपासून ते वरीष्ठ स्तरावरील नेत्यांपर्यंत प्रत्येक जण धडपड असतो. जनतेची सेवा करण्यात भाजप आघाडीवर आहेच परंतू जनतेला केंद्रबिंदू मानून केंद्रात मोदी सरकार तर राज्यात फडणवीस सरकार लोकाभिमुख कामगीरी करत आहे. त्यामुळे आता भाजपच जनतेला आपला पक्ष वाटत आहे. असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले. कवठाळा येथे विविध पक्षांच्या सरंपच व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी स्वागतपर मनोगतात ते बोलत होते.
शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि बाखर्डी-पालगांवचे सरपंच अरुण रागीट, कवठाळाच्या सरपंचा तथा शिवसेना उ.बा.ठा च्या कार्यकर्त्या सौ. रूपाली बोबडे यांचेसह शेतकरी संघटना, काँगेस, शिवसेना (उबाठा) च्या कवठाळा व बाखर्डी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
पुढे बोलताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, भाजपा-महायुती सरकार हे जनतेचे सरकार आहे. केंद्र व राज्य सरकार जनतेला केंद्रबिंदू मानून काम करत करत आहे. सरकारच्या प्रत्येक योजना ह्या लोकाभिमुख असून तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत त्या योजना पोहचून त्यांचा लाभ मिळेल, यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
आज श्री. अरूण रागीट व सौ. रुपाली बोबडे या युवा सरपंचांनी भाजप परीवारात पक्षप्रवेश करून जनसेवेचा नवा अध्याय सुरू केला आहे. त्यांच्या या प्रवासाकरता माझ्या अनेक शुभेच्छा आहेतच परंतू या भागाच्या सर्वांगीण विकासाकरता तसेच जनतेच्या हाकेला ओ देण्याकरता त्यांनी सातत्यपूर्ण सेवा द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला मंचावर भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरविंद डोहे, अरूण मडावी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, राजुराचे तालुकाध्यक्ष वामन तुराणकर,पुरुषोत्तम आस्वले, नांद्याचे उपसरपंच पुरुषोत्तम भोंगळे, अमोल आसेकर, पवन यादव, हितेश चव्हाण, विजय रणदिवे, संजय नित, रवी बंडीवार, रविशंकर जाम, नैनेश आत्राम, दिनेश खडसे,तिरुपती कन्नाके, संजय चौधरी, नरेंद्र मडावी, अनिल आत्राम, सचिन कुळमेथे, अशोक झाडे, निखिल भोंगळे, ओम पवार, प्रमोद कोडापे, दीपक मडावी, प्रणय अतकारे, श्रीकृष्ण गोरे, सुनील खारकर, राहुल पायघन, वसंता बदखल, रामदास कोहळे, पांडुरंग रागीट, कवडू मेश्राम, सुमेध चांदेकर, महादेव मडावी, लालचंद नगराळे, सुभाष टेकाम, बंडू निरंजने, सतीश जमदाडे, दिनेश ढेंगळे, सचिन आस्वले,अमोल गोरे, राकेश अरोरा, रमेश चुदरी यांचेसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.