कमल स्पोर्टींग क्लबच्या विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत जय शितलामाता मंडळ विजयाचा शिल्पकार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : शहरातील नामांकीत कमल स्पोर्टींग क्लब चंद्रपूरच्या वतीने दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत बाबुपेठ येथील जय शितलामाता मंडळाने 6 स्तर उभारून 30 फूट उंचावरील दहीहंडी फोडून विक्रम प्रस्थापित केला व हे मंडळ विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयी चमुचे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व रू. 1 लाख 11 हजार एकशे एक रूपयांचे पारितोषिक प्रदान करून विजयी गोविंदांचा सन्मान करण्यात आला.
स्थानिक विठ्ठल मंदिर वार्डातील टागोर शाळेच्या भव्य पटांगणावर अभुतपूर्व संख्येतील प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर शहर पो.स्टे.चे निरीक्षक निशिकांत रामटेके यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी मनपाचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष तथा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, या प्रभागाच्या माजी नगरसेवीका संगीता खांडेकर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, रविंद्र गुरनुले, राजू घरोटे, विनोद शेरकी, मनोज पाल, मयुर हेपट, श्यामल अहीर, हर्षवर्धन अहीर, राजवीर चैधरी, कमल कजलीवाले, शाम कनकम, प्रदिप किरमे, सचिन कोतपल्लीवार, राजेंद्र खांडेकर, गणेश गेडाम, आशिष मशारकर, धनंजयभाऊ येरेवार, प्रकाश मस्के, निलेश माळवे यांचेसह अन्य मान्यवर अतिथींची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रघुवीर अहीर यांनी दहीहंडी कार्यक्रमामागील कमल स्पोर्टींग क्लबची भुमिका विषद करीत या कार्यक्रमाचे महत्व आणि पावित्र्य जपण्याची सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. गौमाता व दहीहंडी भगवान श्रीकृष्ण यांचे युगानूयुगे ऋणानुबंध प्रत्येकांनी जपले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी हंसराज अहीर तसेच आ. किशोर जोरगेवार यांनी जन्माष्टमी आणि दहीहंडी कार्यक्रमामागील सनातन संस्कृतितील महत्व विषद केले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रशंसोद्गार काढले. या स्पर्धेमध्ये अनेक मंडळाच्या गोविंदांनी उपस्थिती दर्शविली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राहुल गायकवाड, जगदिश दंडेले, प्रतिक शिवणकर, आशय चंदनखेडे, राजेश खनके, अभिजीत आकोजवार, गिरीष हुड, अमोल माळवे, कृपेश बडकेलवार, मयूर भोकरे, राहुल सुर्यवंशी, चेतन शर्मा व कमल स्पोर्टींग क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रतिक शिवणकर यांनी केले. कार्यक्रमास प्रेक्षकांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.