ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आसोला ग्रामपंचायतचा अजब कारभार

चाळीस वर्षापासून निवासी असलेल्या घर नमुना आठवर ; दाखविले शासनाचा मालकी हक्क

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुक्यातील असोला जहांगीर येथील चाळीस वर्षापासून रहिवासी असलेल्या निवासी धारकांना ग्रामपंचायतने परस्पर कोणतीही पूर्व सूचना न देता ग्रामपंचायत आठ अ वर भोगवटदार लाभार्थी आणि मालक शासन नोंद केल्यामुळे बहात्तर रहिवासी धारकांना शासकीय योजने पासून वंचित राहावे लागत असल्याने संबंधित निवासी धारकांनी आज पंचायत समिती समोर ग्रामपंचायत आठ अ वर स्व मालकी हक्क दाखवण्यासाठी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे

 सविस्तर वृत्त असे की

 तालुक्यातील असोला जहांगीर ह्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये वाढीव गावठाण सन 2010 नंतरच्या आठ उताऱ्यावर सरकार असे लिहून येत आहे विशेष बाब म्हणजे 2010 च्या अगोदरच्या काळामध्ये सदर घर नमुना 8 उताऱ्यावर सदर गावठाण जमिनीवर मालकी हक्क शासन दाखवण्यात आलेला नव्हता त्यानंतर ग्रामपंचायत ने कसलीही पूर्वसूचना न देता जुने आठ अ रद्द करून भोगवटदाराच्या मालकासह सदर जागेला शासनाचा मालकी हक्क दाखविला त्यामुळे आठ अ नक्कल काढताना निवासी धारकांना भोगवटदार त्यांचे नाव आणि मालक शासन अशी घर नमुना आठ अ अशी नक्कल मिळते त्यामुळे सदर बहात्तर घरमालकांना कुठल्याही प्रकारचा शासनाचा लाभ मिळत नाही पोषणकर्त्यांनी निवेदनात नमूद केल्या प्रमाणे इसवी सन 2010 च्या अगोदर आम्ही मालक होतो आता शासन कसे याचे उत्तर संबंधित ग्रामसेवकाकडून देण्यात येत नाही पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतकडे वेळोवेळी लेखी अर्जाद्वारे पाठपुरावा केला परंतु त्याला कसल्याही प्रकारचे यश आले नाही त्यामुळे घर निवासी पंचायत समिती समोर न्याय हक्कासाठी उपोषणास बसले आहे

 उपोषणकर्त्यांची तहसीलदार यांच्याकडून दखल

 उपोषण करते उपोषणास बसल्यानंतर तहसीलदार श्याम धनमने यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सर्व कागदपत्राची पडताळणी केली असता यामध्ये तथ्य असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले यावर गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेऊ असे म्हटले

 उपोषणकर्त्यांमध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त प्रमाणात होता यामध्ये प्रभाकर डोईफोडे, दादाराव म्हस्के, अरुण शेळके, प्रकाश डोईफोडे, प्रलाद शेळके, पंढरी जायभाय, दत्तू जाधव, रामचंद्र पसरटे,दत्तू मांटे, सुखदेव मांटे,द्रोपदाबाई जाधव,जनाबाई डोईफोडे, सुमन डोईफोडे, आसराबाई जाधव,निर्मला पसरटे, आशा शेळके, पंचशीला मोरे,सयाबाई मांटे, कमलबाई शेळके आदींचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये