ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहनासह विदेशी, दारुचा एकूण 3 लाख 08 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 20/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अँटी गँग सेल पथक पो स्टे सावंगी मेघे व राम नगर परीसरात रात्र गस्त दरम्यान गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सावंगी मेघे येथे राहणाऱ्या 02 महिला दोन मोपेड गाडीने अमरावती जिल्ह्यातून विदेशी दारूची वाहतूक करीत आहे.

 अशा माहितीवरून तीचेवर नाकेबंदी करून घेराव टाकुन प्रो रेड केला असता दोन्ही महिलांचे ताब्यातुन पंचासमक्ष 1) आफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 118 सिलबंद शिश्या ज्याचा बेंच न 480/23 दिनांक 24/12/23 प्रतीनग 300 रु. प्रमागणे 35,400 रु, 2) RS कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 84 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं 2877 दिनाक 07/12/23 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 29,400 रु ३) ओ सी कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एमएल च्या 96 सिलबंद शिश्या ज्याचा बैंच न. 476 दि 25.12. 23 प्रती नग 350 रु. प्रमाने 35,400/ रु. 4) आरसी कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम एल च्या 24 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं. 1057 दी 25/10/23 प्रतीनग 350 रु प्रमाणे 8,400 रु. 5) एक मेहंदी रंगांची burg man मोपेड गाडी क्र MH 32 AQ 8885 की 1,00,000 रू 6) एक निळ्या रंगांची burg man मोपेड गाडी क्र MH 32 A R 4858 की 1,00,000 रू एकुण जु.कि. 3,08,600/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपी क्रं 01 हिला जप्त विदेशी दारुबाबत विचारणा केली असता तीने स्वतः जिल्हा अमरावती येथील उदय बार मालक राजु जयस्वाल रा सावंगी मेघे याच्या बार मधुन विकत आणल्याची माहिती दिली. सदर तिन्ही आरोपीतांविरुध्द पो स्टे सावंगी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

     सदर कारवाई मा. श्री. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि उमाकांत राठोड, अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार गोपाल बावनकर, मंगेश आदे, महिला पोलिस अंमलदार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये