ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारभार

चार वैद्यकीय अधिकारी असून ओ.पी डी. दहा वाजता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर

कोरपणा तालुक्यातील आदिवासी भागातील सर्व सामान्य जनतेचा एम बी बी एस दवाखाना म्हणजे ग्रामीण रुग्णालंय कोरपणा मात्र येथे येणाऱ्या सर्व सामान्य जनतेला वेळेवर उपचार मिळत नाही .विशेष म्हणजे कोरपणा परिसरातील आदिवासी बांधव तसेच वणी तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात मात्र येथील चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून सुद्धा ओ.पी डी च्या वेळेत हजर राहत नाही.

असा प्रकार या ठिकाणी नेहमीच घडत आहे.दिनांक 20 ला शनिवारला एकही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने रुग्णांना बराच वेळ डॉक्टर साहेबांची प्रतीक्षा करावी लागली आंतर रुग्णांना तपासानी राउंड झाला नाही .कोरपणा ग्रामीण रुग्णालयात लहान कर्मचारांना नियम आहे मात्र अधिकारी बेजबाबदार वागत असल्याने बाहेरून येणाऱ्या रुग्णांना उपचार मिळत नाही .काही अधिकाऱ्याच्या दबवामुळे थातूर मातूर उपचार करून रुग्णाचे समाधनं करून परत पाठविले जात आहे. चार पैकी एकच वैद्यकीय अधिकारी तीन चार दिवस रात्र कर्तव्य बजावीत असून आपापल्या सोई नुसार डिव्हटिवर येतात.

मात्र, लहान कर्मचारी अधिकारी नसल्यामुळे परीशान. आठवड्यात दोन दिवस रुजू पगार महिना भरचा.बऱ्याच वेळा आर बी एस के च्या दोन वैद्यकीय अधिकारी यांना सुद्धा या ठिकाणी कामाला लावले जातात. काही वैद्यकीय अधिकारी ओळखीचे किंवा नातेवाईक आले की डिव्हटि नसताना सुद्धा उपचार देण्यासाठी हजेरी लावतात अशा वेळी सर्व सामान्य रुग्णाकडे दुर्लक्ष होत आहे .स्वताचे दवाखाणे चालू असून सरकारी दवाखाना पेक्षा तिकडे जास्त लक्ष पूर्वतात .एका वर्षा पूर्वी नावाजलेला कोरपणा ग्रामीण रुग्णालंय आज येथील अधिकाऱ्याच्या बेवारस झाल्याची चर्चा होत आहे.रुग्णांना बरोबर मूलभूत सुविधा मिळत नाही शुद्ध पिणाच्या पाण्याची व्यवस्था नाही.बाहेर वापरण्यासाठी रुग्णांना बरोबर पाणी नाही या बाबीकडे प्रशासणाचे लक्ष नाही.

काही वैद्यकीय अधिकारी रुग्णा बरोबर कर्मचगाऱ्याना बरोबर वागणूक देत नसल्याची चर्चा एकवण्यात येत आहे.तरी ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथील समस्ये कडे जिल्हा शल्यचित्सिसक साहेबानी लक्ष देऊन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सहकार्य करावे येथील बेजबाबजार वैद्यकीय अधिकारी यांचे स्थलातर करावे अशी मागणी रुग्ण व नातेवाईक तसेंच कोरपणा परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये