ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हातील युवक सहभागी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कर्तव्यपथ दिल्ली येथे पार पडला समारोपीय कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्य संग्रामातील वीर हुतात्म्यांना वंदन करण्याकरिता संपूर्ण देशभरात “मेरी माटी मेरा देश” हे अभियान राबवून संपूर्ण भारतातील गाव- खेड्यातून पवित्र माती गोळा करून ती अमृत कलश यात्रेअंतर्गत जिल्हातील तरुणांच्या हस्ते दिल्ली येथे नेण्यात आली. दिल्ली येथील कर्तव्यपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशभरातून गोळा केलेल्या मातीचे पूजन करण्यात आले. या पवित्र मातीपासुन दिल्ली येथे अमृत रोपवाटिका तयार करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्हातून प्रशासनाच्या वतीने जिल्हा समन्वयक म्हणून मिलिंदकुमार कुरसुंगे, जिल्हा समन्वयक तथा युवक प्रतिनिधी म्हणून निकीलेश चामरे, चंद्रपूर तालुका प्रतिनिधी म्हणून भाग्यश्री निमकरडे, गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी म्हणून सुरज पी. दहागावकर, अश्विनी वांढरे, राजुरा तालुका प्रतिनिधी म्हणून कशिश धोंगळे, आदर्श तेलंग, कोरपना तालुका प्रतिनिधी म्हणून जयश्री चिक्राम, रिना लांडे, जिवती तालुका प्रतिनिधी म्हणून सतीश कांबळे, तुलसीदास जाधव, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी म्हणून क्रांतिवीर सिडाम, सारंग सहारे, ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी म्हणून सुरज दोनाडकर, तेजस दोनाडकर, नागभीड तालुका प्रतिनिधी म्हणून बंडू फटाले, सुरज चौधरी, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी म्हणून नितीन कामडी, शुभम मेश्राम, चिमूर तालुका प्रतिनिधी म्हणून गणेश माहूरे, जीवन घुगुस्कर, वरोरा तालुका प्रतिनिधी म्हणून शुभम आमने, निकिता माणूसमारे, भद्रावती तालुका प्रतिनिधी म्हणून अविनाश जीवतोडे, अविनाश नागोसे, मुल तालुका प्रतिनिधी म्हणून शुभम बलगेवार, रितेश घोगरे, सावली तालुका प्रतिनिधी म्हणून अनिकेत वाढनकर, रोशन मुनघाटे, पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी म्हणून आशिष उराडे, गुणेश लेनगुरे, चंद्रपूर महानगरपालिका प्रतिनिधी म्हणून विश्वास घडसे, आकाश दुपारे, चंद्रपूर नगर प्रशासन विकास विभागाच्या वतीने शुभम पाटील, संदिप कांबळे सहभागी झाले होते.

दिल्ली येथील कर्तव्यपथावर पार पडलेला मेरी माटी – मेरा देश या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आम्हाला साक्षीदार होता आले. या निमित्याने देशभरातून आलेल्या मातीतून अमृतवाटिका तयार होईल आणि या अमृतवाटिकेत आमचा सहभाग असेल याचा आम्हाला अभिमान आहे. असे मत विद्यार्थी जिल्हा समन्वयक निकीलेश चामरे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात जिल्हाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याची संधी नेहरू युवा केंद्र चंद्रपूर यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल व या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल आणि संपूर्ण प्रवासाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने केल्याबद्दल सहभागी युवकांच्या वतीने सुरज पी. दहागावकर यांनी नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये