ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार महाविद्यालयाच्या स्वप्नील मेश्राम, प्रेम जरपोतवार यांना चंद्रपूर रत्न पुरस्कार प्रदान

चांदा ब्लास्ट

  सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथे विद्यार्थ्याना समाजकार्याचे शिक्षण दिले जाते. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय नेहमी तत्पर असते. महाविद्यालयाच्या एम.एस.डब्ल्यु द्वितीय वर्षाच्या दोन विद्यार्थ्याना त्यांच्या विशेष कार्यासाठी चंद्रपूर रत्न पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.
स्वप्नील हा युवा कवी, साहित्यीक आहे. विवीध वर्तमानपत्रात आजवर कविता प्रकाशित झाल्या आहेत. कवी, ग्राफिक्स डिझायनर, सुत्रसंचालक, निवेदक म्हणून त्याने ओळख मिळवली आहे. सामाजिक कार्यात व विविध संस्थेत सक्रिय आहे. इंस्टाग्राम पेजवर त्याचे लाखो फॉलोवर्स आहेत. सूर्यांश साहित्य व संस्कृतिक मंच या संस्थेने खरी ओळख मिळवून दिली. राज्यस्तरीय साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन अशा विविध संमेलनात संयोजक, कार्यकर्ता म्हणून भुमिका पार पडली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, वर्धा येथे कविकट्टा साठी कवितेची निवड करण्यात आली. विवीध पुरस्कार या अगोदर प्राप्त झाले आहेत. विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखा चंद्रपूर या संस्थेत प्रसिद्धी प्रमूख म्हणून कार्यरत आहे.
प्रेम जरपोतवार याने जुनोना गावात “अभ्यासवर्ग-शाळे नंतरची शाळा” उपक्रम सुरु करून विद्यार्थांना शिक्षणाचे धडे दिले. कोरोना काळात जनजागृती, विद्यार्थ्यासाठी अभ्यास वर्ग, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम, ग्रामस्वछता, शासनाच्या विविध योजनाची जनजागृती, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबीर, रक्तदान, तसेच विविध नामांकित संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हूणन कार्य  केले होते. नेहमी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन त्यांने कार्य केलेले आहेत. याच कार्याबद्दल प्रेमला सामाजिक कार्यासाठी शिक्षणप्रेमी पुरस्कार, आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार , महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणार मिस्टर एसआरएम पुरस्कार  मिळाला आहे. इतकेच नाही तर २०२३ च्या राज्यस्तरीय युवा संसद मध्ये मुंबई येथे चंद्रपूर जिल्ह्याचे आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्रतिनिधित्व केले आहेत. सध्या कलाम फॉउंडेशन, चंद्रपूर या नावाने संस्था स्थापन झाली असून त्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे.
साहित्यिक कार्यासाठी स्वप्नील मेश्राम याला तर सामाजिक कार्यासाठी प्रेम जरपोतवार याला ९ फेब्रुवारीला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या बद्दल दोघांनाही महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. जयश्री कापसे, प्रा. डॉ किरणकुमार मनुरे व सर्व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले आह आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये