ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी व गावठी मोहा दारुचा माल जप्त करून एकूण 1 लाख 57 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दिनांक 10/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा उपविभाग आर्वी मार्फत पो स्टे आष्टी परीसरात अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून गोरखेडा येथे राहणारा अवदुत समरत कठाणे व विशाल अवदुत कठाणे त्याचे ताब्यातील ग्रे रंगाची हिरो कंपनीची डेस्टिनी मोपेड गाडी क्र MH-32-AV-0116 मोर्शी आष्टी मार्गाने येत आहे अश्या माहिती वरून त्यांचेवर घेराव टाकुन प्रो रेड केला असता त्याच्या ताब्यातील मोपेड गाडी देशी व गावठी मोहा दारु मिलून आल्याने वरून पंचांसमक्ष 1) एका चुगडी मध्ये देशी दारु च्या बॉबी कंपनीच्या 90 ml च्या 475 सीलबंद शिष्या कि. 47,500/- रू.2) दोन प्लॅस्टिक डबकी मध्ये 20 लिटर गावठी मोहा दारू डबकी सह की.4,600/- रू.3)एक ग्रे रंगाची हिरो कंपनीची डेस्टिनी मोपेड गाडी क्र MH-32-AV-0116 की 1,05,000/- रु.एकुण जु.कि. 1,57,100/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी 1) अवदुत समरत कठाणे, वय 52 वर्ष, रा. गोरखेडा वॉर्ड क्र-6, ता. आष्टी जि. वर्धा 2) विशाल अवदुत काठाने वय 24 वर्ष,रा. गोरखेडा वॉर्ड क्र-6, ता. आष्टी जि. वर्धा 3) जगदीश जयस्वाल रा. मोर्शी जि. अमरावती देशी दारु दुकान मालक (पसार) आरोपीतान विरुध्द पो स्टे आष्टी येथे गुन्हा नोंद करन्यात आला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री नूरूल हसन, डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे स फ़ौ संतोष दरगुडे पो हवा भूषण निघोंट ना पोशी विकास अवचट राकेश आस्तानकर हर्षल सोनटक्के यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये