ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’ लोकसेवकांना घराच्या बाहेरही पडु देऊ नका

आंदोलनात बसलेल्या सामान्य शिवसैनिकांनी व्यक्त केले प्रतिपादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आपण आज या पवित्रस्थानी आंदोलन करतो आहे. ज्या मातेने छत्रपती राजे शिवाजी महाराजासारखा पुत्र जन्मास घातला, ज्या विरानी सर्व कुळाचा उध्दार व्हावे, ज्यांनी सर्व जाती धर्मांना समान न्याय मिळावे यासाठी छत्रपती शाहु महाराज, ज्या पट्ट्याने वाघाचा जबडा फाडला अश्या शुरवीर, धर्मवीर कर्मवीर मर्दाचा छावा संभाजी महाराज यांचे याठिकाणी शिल्प बसवावे यासाठीच ना! हे शुरवीर आपल्या लोकप्रतिनिधींचे काहीच लागत नाही कां? निवडणुका आल्या की हेच सामर्थ्यवीर त्यांना आठवतात काय? याचा विचार करण्याची वेळ आपल्या सारख्या सामान्य सैनिकांवर का यावी?

ही गंभिर बाब आहे. आता त्या लोकप्रतिनिधींना लोकसेवकांना घरी बसविण्याची वेळ शिवभक्तांवर आली असुन, त्या लोकसेवकांना घराच्या बाहेरही पडु देऊ नका असे प्रतिपादन आंदोलनात बसलेल्या सामान्य शिवसैनिकांनी व्यक्त केले. धुनिवाले चौकात त्या महान राजे व मातेचे शिल्प बसवावे यासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक विचारवंतांनी केले. व पुढे बोलतांना म्हणाले, आपण यापुर्वी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर आमदार रणजित कांबळे यांना निवेदनाव्दारे अवगत केले होते. तर कार्यकारी अभियंत्यांनाही निवेदन दिले. परंतु त्या महामानवांनी यांची दखलच घेतली नाही, आता त्यांची वेळ भरत चालली असुन मतदारांनी हातात मशाल घेऊन त्यांना पेटवत चला.

असे आवाहन गुरु द्रोणाचार्य मंडळाचे अध्यक्ष तुषार देवढे, कृषिसेनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. उमाकांत डुकरे अ. भा. मराठा महासंघाच्या शैलजा साळुंके, नागपुरचे अ.भा.म.रा. संघ विदर्भ अध्यक्ष मनोहरराव कवले, शिंदे गट शिवसेनेचे वर्धा विधानसभा अध्यक्ष सुभाष वैरागडे, नागपुरचे चंद्रशेखर जाधव, महेश काशिद, रविंद्र मोहिते, चंद्रशेखर इंगोले, नरेश शिंदे, दत्तात्रय ठोंबरे, पुखराज मापारी, जितेंद्र खोत, माधवी देशमुख, माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलाध्यक्षा शरयु वांदिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस शारदाताई केणे, अंकिता जगताप, अरुणराव जगताप, मीनाताई इंगळे, राजेश वाकडे, दिलीप चव्हाण, अक्रमखाँ पठाण, यांचे दणकुन भाषणे झाली. लोकप्रतिनिधी हाय हाय च्या घोषणा देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये