ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री मा सा कन्नमवार यांची जयंती साजरी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड येथील बेलदार /कापेवार समाज बांधव व महिला बचत गटाच्या वतीने मा मुख्यमंत्री मा सा दादासाहेब कन्नमवार साहेब यांची १२४जयंती नागभीड येथील प्राथमिक शिक्षक को ऑप सोसायटी येथे संपन्न झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा दिवाकर आयलनवार होते तर प्रमुख अतिथी श्रीहरी चिल्लमवार, नेरला वार साहेब वनपाल, वृषाली कोपूलवार, दाचेवार, महसूल, दीपाली चिल्लमवार यांची उपस्थिती होती.

मा माजी मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला पुस्पंहार अर्पण करून दीप प्रज्वलीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयलनवार साहेब यांनी मा मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार साहेब यांच्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय जीवन पटावर प्रकाश टाकला. यावेळी विविध स्पर्धा आयोजित करून विजयी स्पर्धकाचे वृषाली कोपूलवार व मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कोपूलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन बंटी पिट्टूलवार यांनी केले यावेळी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये