ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे

 काश्मीर येथील पहलगम मध्ये भारतीय व परदेशी पर्यटकांवर पाक धार्जिन्य अतिरेक्यांनी अमानुष पने जो भ्याड हल्या केला या हल्ल्यात जे नागरीक मृत्यू मुखी पडले त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन 1मे रोजी करण्यात आले होते. यानिमित्ताने निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला तसेच त्या हल्ल्यामध्ये ज्यांना मरण पत्करावे लागले.

त्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊळगाव राजातील महाद्वार चौकात नवसंकल्प प्रतीक्षा फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आली. प्रतिक्षा डान्स स्टुडिओ चे चिमुकले तसेच फाउंडेशनच्या प्रमूख प्रतिक्षा ताई कुलकर्णी, डॉ.शितलताई सोळुंके पूजाताई खांडेभराड, सविताताई पाटील, ललिताताई पावले, रेखाताई बोरकर, ऐश्वर्या शिसोदे , प्रतिभाताई देवउपाध्ये, मंजुषा तरवडे इतर महिला व पुरुष देखील उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये