नैसर्गिक आपत्ती, पिक विमा, पी एम किसान योजना चे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कपात न करता जमा करा
सुभाष सवडे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नैसर्गिक आपत्ती, पिक विमा, पी एम किसान व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न करता शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होत असल्याने शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला आहे, तेव्हा शासनाकडून शेतकऱ्यांच्या नावावर आलेले अनुदान हे पिक कर्ज खात्यात जमा न करता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करावे अशी मागणी सुभाष भगवानराव सवडे रा रोहणा यांनी तहसीलदार व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.
तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी तत्काळ दखल घेत सर्व बँक व्यवस्थापक यांना कळविले आहे की, शासनाकडून नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेला मदत निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा वसुली साठी वळती करु नये, त्यांच्या खात्यात थेट जमा करावा, अनुदान कपात केल्याचे आढळून आल्यास संबंधीत बँकेवर शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी कळविले आहे.