ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

          अवघ्या जगाचे आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात जगभरात साजरी होत आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचं युद्धकौशल्य, स्वराज्य, स्त्रीदाक्षिण्य, जाती-पातीच्या पलिकडचं सत्ताकारण अशा पैलूंचे अनेक प्रसंग आज इतिहास अभ्यासक, व्याख्याते जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. शिव व्याख्याते उद्धव शेरे पाटील यांनी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांना शिवछत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या विषयी असे अनेक प्रेरणादायी प्रसंगाचे वर्णन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धकौशल्याची भुरळ अमेरिकेलाही पडली. अमेरिकेच्या वेस्ट पॉईंट नावाची सैन्य अकादमी आहे. या अकादमीमध्ये दोन सँड मॉडेल्स आहेत, जी आपल्या येथील लढायांची आहे ज्या स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स शिकवतात. त्यातलं एक मॉडेल प्रतापगडाच्या अफझल खानासोबतच्या लढाईचं आहे. तर दुसरं मॉडेल बाजीरावाच्या 1728 पालखेडच्या लढाईचं आहे. बाजीरावाने या लढाईत निझाम उल मुल्कचा पराभव केला होता. ऑक्सफर्ड मॅनेजमेंट डिक्शनरीतील बहुतांश शब्द देखील युद्धभूमीतून आले आहेत.

असे हि त्यानी बोलताना सांगितले यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपल्या भाषणातून आणि पोवाड्यातून शिवचरित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले.

यावेळी शिवव्याख्याते उद्धव शेरे पाटील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रेसिडेंट डॉ मिनलताई शेळके, सेक्रेटरी डॉ.रामप्रसाद शेळके, सीईओ सुजित गुप्ता शैक्षणिक प्रमुख प्रिन्सिपल डॉ. प्रियांका देशमुख मॅडम उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये