Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

उपोषणकर्त्याची आमदार मनोज कायंदे यांनी रुग्णालयात घेतली भेट… 

रास्त मागण्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

खडक पूर्णा धरणातील पाणी नद्यांना जोडून नदीजोड प्रकल्पाची अमलबजावणी त्वरित करावी या मागणीसाठी कैलास नागरे यांनी या शिवणी आ र मा ळ येथे 15 डिसेंबर पासुन अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते,20 डिसेंबर रोजी प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन लेखी आश्वासनानंतर तूर्तास उपोषण मागे घेतले आहे.

उपोषण करते कैलास नागरे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे. आमदार मनोज कायंदे नागपूर येथे चालू असलेल्या अधिवेशनात व्यस्त असताना सुद्धा उपोषण करते यांच्या सोबत वारंवार भ्रमणध्वनी वरून संपर्कात होते अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात येताच त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपोषण कर्ते कैलास नागरे यांची भेट घेतली आणि कैलास नागरे यांनी प्रशासनाकडे केलेल्या मागण्या समजून घेतल्या. जवळपास संपूर्ण मागण्या ह्या ज्वलंत असल्याने निवेदनतील मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीत संबधीत कार्यकारी अभियंता यांच्यासोबत 24 डिसेंबर 2024 रोजी तात्काळ बैठकीचे आयोजन केलेले आहे संबंधित बैठकीमध्ये उपोषण करते कैलास नागरे म्हणून आपण सुद्धा उपस्थित राहावे असे सांगितले .त्या संदर्भात संबंधित सूचना सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये