ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीस पालकांचे ताब्यात

अज्ञात इसमाने पळवुन नेल्याबाबत तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 28.01.2025 रोज पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे फिर्यादी जिल्हा यवतमाळ यांनी त्यांची अल्पवयीन मुलगी ही ग्राम कानगाव ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा येथुन कुणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेल्याबाबत तक्रार केली होती. वरून पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे अपराध कमांक 53/2025 कलम 137(2) बि.एन. एस प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता.

सदर गुन्ह्यात वरीष्ठांचे निर्देशावरून ठाणेदार सपोनि श्री प्रफुल डाहुले, पोलीस हवालदार रवी वर्मा पोलीस अंमलदार गणेश कन्नाके चमुने लगेच तपास चके फिरवत अल्पवयीन मुलगी व आरोपी नामे गजानन म्हैसकार यास घाटंजी घोटी जिल्हा यवतमाळ येथुन 48 तासांचे आत ताब्यात घेवुन अल्पवयीन मुलीस पालकांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रफुल डाहुले. पोलीस हवालदार रवी वर्मा, पोलीस अंमलदार गणेश कन्नाके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये