ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवा रेल्वे दुर्गा मंडळ भांदक इथे दांडिया स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      दिवगंत खासदार स्व. बाळुभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भांदक रेल्वे स्थानकावरील सर्व धर्म समभावाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या युवा रेल्वे दुर्गा मंडळातर्फे भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रवीण काकडे, पार्थ धानोरकर यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सरवर अली, महिला आयोजक रश्मी ठाकरी, पुरुष आयोजक किशोर ठाकरी, संदीप डाफ, पंकज चालखुरे, रुपेश मडावी सूरज गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत शहरातील अनेक महिला व पुरुष पथकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक ए. बी. ग्रप भद्रावती तर द्वितीय क्रमांक नटरंग ग्रुप व तृतीय क्रमांक भांद क ग्रुप भद्रावती यांनी पटकाविला. याशिवाय स्पर्धेतील अन्य विजेत्यांना प्रोत्साहन पर बक्षीसे देण्यात आली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सभारभाला रेल्वेचे वरिष्ठ अभियंता निखिल आकुलवार, डॉ. ममता आकुलवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सदर मान्यवरांच्या हस्ते विजत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रसंगी जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा तर्फे स्पर्धेतील विजेत्यांना गणेश डोंगे यांचे हस्ते रोख पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन विक्रांत बिसेन तर आभारप्रदर्शन स्टेशन मास्टर प्रमोद तांडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय परेकर, अमोल देठे, नरेंद्र पारखी, संतोष पारखी, पंकज वडस्कर, संदीप यादव, सुमित कांबळे, रामचंद्र बोरकुटे, निलेश साव, कार्तिक केवट, सचिन बोडे आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये