Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय गांधी अनुदान योजनेतील २८७ लाभार्थ्यांना मंजुरी

२९२ लाभार्थ्यां पैकी २८७ लाभार्थ्यांना मंजुरी प्रदान : ४७ प्रकरनात निघाल्या त्रूटी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           संजय गांधी अनुदान योजनेची बैठक २६ सप्टेंबर ला समिती चे अध्यक्ष विजय वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेचे कामकाज सचिव तहसीलदार खाडंरे यांनी पाहीले.या सभेत विविध योजनेतील एकुण २९२ प्रकरणापैकी २८७ पैकी ४७ प्रकरणे तृटीत काढण्यात आले आहे.

      या सभेला उपस्थित नगर परिषदेचे प्रतिनिधी जगदीश गायकवाड, प. स.चे प्रतिनिधी बुजाडे मॅडम, नायब तहसीलदार पठाण, सं.गां नि. योजना सदस्य दिनेश कोलटकर, प्रदिप देवतळे, अव्वल कारकून गजानन ढोबळे यांनी पाहीले.सभेत संजय गांधी योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना, श्रावनबाळ योजना चे प्राप्त झालेले सर्व अर्ज झाननी करीता व मंजूर करण्याकरिता सभेमध्ये ठेवण्यात आले होते.

एकूण प्राप्त अर्ज २९२पैकी संजय गांधी योजनेची ६१ अर्ज प्राप्त झाले.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजनेची ६० अर्ज प्राप्त झाले श्रावनबाळ योजना ११९ अर्ज प्राप्त झालेल्या पैकी संजय गांधी योजनेतील एक अर्ज नामंजूर करण्यात आले तर श्रावनबाळ योजनेतील ४ अर्ज नामंजूर करण्यात आलेल्या एक अर्ज हा दोन योजनेत ठेवण्यात आला होता चार अर्ज हे योजनेला लागणारी कागदपत्रे अपूरे असल्या कारणाने समितीने नामंजूर करण्यात आले तर ४७ प्रकरणे तृटिमध्ये काढण्यात आले असून संबंधित लाभार्थ्यांना पुढील सभेत तृटिची पूर्तता करुन सभेत ठेवण्याच्य सुचना सभाअध्यक्ष विजय वानखेडे यांनी केल्या तसेच दुर्धर आजारा मध्ये डायलिसिस च्या रुग्णांना समाविष्ट करता येतो का हे तपासून पाहावे जेणेकरून या लाभार्थ्यांना सुध्दा या योजनेचा फायदा देता येईल असा सुचना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष विजय वानखेडे यांनी केल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये