Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

चंद्रपूरच्या कोचिंग सेंटर मधे विद्यार्थिनीची आत्महत्या? – मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून व व्हिडिओ बनवून संपविली जीवनयात्रा?

इंस्पायार कोचिंग सेंटर मधे सापडला विद्यार्थिनीचा मृतदेह - एक दिवसांपूर्वीच सापडला मृतदेह

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

 

चंद्रपुर शहरातील प्रतिष्ठित इन्सपायर कोचिंग क्लासेसमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस स्टेशनने तपास सुरू केला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मारेगाव येथिल ही विद्यार्थिनी निट (NEET) कोर्ससाठी इन्सपायर कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेत होती. विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागे अभ्यासाचे दडपण होते की इतर काही कारण होते तसेच तिने कोचिंग सेंटरच्या वसतिगृहात मधे आत्महत्या का केली? तिथे तिच्या सोबत काही वाईट वागणुक झाली होती का ह्याबाबत तपासात सत्य बाहेर येईल.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना एका दिवसापूर्वी घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी इन्स्पायर कोचिंग सेंटरच्या वस्तीगृहात व कोचिंग सेंटरच्या कार्यालयात पोहोचून तपास सुरू केला. या घटनेमुळे चंद्रपुरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आत्महत्या आहे की यामागे काही वेगळे कारण आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. सध्या ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

इन्सपायर कोचिंग क्लासेस हे चंद्रपुर शहरातील एक नामांकित शैक्षणिक केंद्र असल्याने या प्रकरणाचा गंभीरतेने तपास सुरू आहे. तसेच, या प्रकरणाचे उघड होण्यास लागलेल्या विलंबाबाबतही पोलिस तपास करीत असुन विद्यार्थिनीच्या आत्महत्येसारखे गंभीर प्रकरण असुनही कोचिंग सेंटर व्यवस्थापनाने पोलिसांना कळविण्यास लावलेला उशिर संशय निर्माण करणारा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट व व्हिडिओ ठेवला होता, परंतु त्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये