पुलगाव पोलीसांची रेती माफियांवर कारवाई
संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 12/02/2025 रोजी पुलगाव पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून आपटी फाटा येथे नाकेबंदी करीत पुलगाव पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई केली असुन कारवाईत 1) एक लाल रंगाचा जुना वापरता MASSEY FERGUSON 7250 DI कंपनीचा ट्रॅक्टर ज्याचा इंजिन नंबर S3255M94181 व चेसिस नंबर MEAA3119KN2451080 असा असुन ज्याची अंदाजे किंमत 6,00,000/- 2) एक जुनी वापरती ट्राली जिचा चेसिस नंबर KAI/03/01/12 असा असुन ज्याची अंदाजे किमत 2,00,000/- रू. 3) सदर ट्राली मध्ये भरून असलेली 100 फुट रेती (1 ब्रास) ज्याची अंदाजे किंमत 5,000/- रू. 4) एक REALME C11 कंपनीचा मोबाईल ज्याची किंमत अंदाजे 8,000/- रू. असा जु.कि. 8,13,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच सदर गुन्हयात 1) प्रकाश वसंतराव ठाकरे, वय 30 वर्ष, रा. बाभुळगाव बोबडे, ता. देवळी जि. वर्धा व आरोपी क. 02) ट्रॅक्टर मालक सचिन भास्करराव बोबडे रा. बाभुळगाव बोबडे यांचे विरूध्द पोलीस स्टेशन पुलगाव येथे अपराध कमांक 111/2025 कलम 303 (2) वि.एन.एस. 2023 सहकलम 3(1), 181,130,177 मोवाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास डि.बी . पथक इन्चार्ज पोहवा रितेश गुजर हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, श्री. राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक सा. पुलगाव व श्री. राहुल सोनवणे, पोलीस निरिक्षक सा. पो.स्टे. पुलगाव यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस कार्यालयाचे पोलीस उपनिरिक्षक सुधीर बनकर, स.फौ. दिपक जाधव पो.अंमलदार उमेश बेले, डि.बी. पथकाचे पोहवा रितेश गुजर, पो.अंमलदार . विश्वजित वानखेडे यांनी केली आहे