ताज्या घडामोडी

वडेट्टीवार समर्थक माजी जिल्हाध्यक्षांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

प्रकाश देवतळे ह्यांचा भाजपात प्रवेश - ना. सुधिर मुनगंटीवार व आ. बंटी भांगडीया ह्यांनी केले पक्षात स्वागत

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्र विधासभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांचे खंदे समर्थक म्हणुन जिल्ह्यात प्रसिध्द असलेले काँग्रेस पक्षाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा वरोरा विधानसभा क्षेत्रातील वजनदार नेते प्रकाश देवतळे ह्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे.

वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर ह्यांना पक्षाने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यापूर्वी जिल्ह्यात वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर असा राजकीय कलगीतुरा रंगला होता. ह्या चढाओढीत प्रतिभा धानोरकर ह्यांनी शिवानी वडेट्टीवार ह्यांना मात देऊन लोकसभेची उमेदवारी खेचुन आणली तेव्हापासूनच काँग्रेस पक्षात असलेली खदखद कशी बाहेर निघते ह्याकडे नागरिकांचे लक्ष लागुन होते. मात्र मुलीची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतरही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांनी कुठलाही असंतोष अथवा नाराजी व्यक्त न केल्याने त्यांची पुढील रणनीती काय ठरते ह्याकडे राजकीय पंडित डोळे लाऊन बसले होते अशातच आज वडेट्टीवार ह्यांचे खंदे समर्थक प्रकाश देवतळे ह्यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

मागील 15 ते 20 वर्षांपासून प्रकाश देवतळे कांग्रेस पक्षात सक्रिय होते, जवळपास 12 वर्षे त्यांनी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद भूषविले होते. कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी भाजप पक्षासोबत युती करीत निवडणूक जिंकली होती, इतकेच नव्हे तर निवडणूक जिंकल्यावर देवतळे ह्यांनी तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष सोबत आनंदोत्सव सुद्धा साजरा केला, त्याबाबत प्रसार माध्यमावर वृत्त प्रकाशीत झाल्यावर प्रदेश अध्यक्ष पटोले यांनी त्यांना पदावरून पायउतार केले होते.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी तेली समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्य केले. नुकतेच त्यांनी कांग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत चंद्रपुरात तेली समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी केली होती, मात्र लोकसभेची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना दिल्याने ते नाराज झाले, काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते व अखेर त्यांनी 29 मार्चला कांग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांच्याकडे पाठविला व काँग्रेस पक्षाशी असलेले आपले नाते संपुष्टात आणले.  भाजपचे लोकसभेचे उमेदवार तथा राज्याचे मंत्री सुधिर मुनगंटीवार व आ. बंटी भांगडिया ह्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

देवतळे म्हणाले की मी अनेक वर्षे पक्षात काम केलं मात्र नेहमी माझ्यावर अन्याय करण्यात आला, कांग्रेसने माझे राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, मी अनेक निवडणुकीत पक्षाला विजयश्री मिळवून दिला त्यानंतर सुद्धा पक्षाने माझ्यावर अन्याय केला, याकरिता मी पक्षाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकाश देवतळे हे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहे, देवतळे यांच्या प्रकाश देवतळे हे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहे, देवतळे यांच्या राजीनाम्यावर सध्यातरी वडेट्टीवार यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये