ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती उपसा करणारी एक बोट महसूल विभागाने केली नष्ट 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 खडकपूर्णा जलाशयातुन रेती माफियांनी मोठ्या प्रमाणात बोटी द्वारे अवैध रेती उपसा सुरु केला आहे.खडकपूर्णा जलाशयातील रेती माफियांच्या अनेक वेळा महसूल विभागाने बोटी नष्ट करुण कारवाई देखील केली आहे.परंतु अद्यापही अवैध रेती उपसा सुरुच आहे. नव्याने रुजू झालेल्या देऊळगांव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाल यांनी पदभार घेताच रेती माफियांची एक बोट नष्ट केली आहे.

खडकपूर्णा जलाशय व नदी पात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक नेहमीच सुरु आहे.मात्र रेती माफिया ही कामे रात्रीला करत असल्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाला रेती माफियांन विरुद्ध कार्यवाही करणे कठीण जाते.

 काल दि 8 फेब्रुवारीच्या मध्यरात्री सिंदखेडराजा महसूल उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने मंडळ आधिकारी व तलाठी यांच्या पथकाने अवैध रेती उपसा करणारी एक बोट पकडून नष्ट केली.या कारावाई सर्व रेती माफिया मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 ही कार्यवाही सिंदखेड राजा महसूल उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड,देऊळगांव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार अस्मा मुजावर, मंडळ अधिकारी विजय हिरवे, तलाठी रामदास मांटे,राजू तागवाले, सागर देशपांडे, विनोद डोईफोडे,सुरेश डोईफोडे, विलास नागरे,संदीप वायाळ, मधुकर उदार,संजय हांडे, संजय बरांडे, पंढरी जायभाये,कोतवाल काकडे,पवन देढे, बंगाळे यांचे पथकाने केली आहे. सदर रात्रीच्या कारवाईने अवैध रेती उपसा व वाहतुक करणाऱ्या रेती माफियामध्ये भिती निर्माण झाली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये