ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थीच देशाचे भवितव्य – सरपंच वैशाली निकोडे

मूल तालुक्यातील कांतापेठ, जानाला, आगडी, फुलझरी, माहाडवाडी, येथील शाळांमध्ये बुक वाटप

चांदा ब्लास्ट

विद्यार्थी हे आपल्या देशाचे भवितव्य आहे यामुळे ही पिढी सुशिक्षित व संस्कारक्षम हवी. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असल्याचे कांतापेठच्या सरपंच वैशाली निकोडे यांनी सांगितले.

त्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात मूल तालुक्यातील कांतापेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये बुक वाटप कार्यक्रमात बोलत होत्या.
मूल तालुक्यातील कांतापेठसह जानाला, आगडी, फुलझरी, माहाडवाडी  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये बुक वाटप करण्यात आले.

यावेळी आगडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा बावणे, आगडीच्या उपसरपंच्या दर्शना किन्नाके,  शिक्षिका वनिता झाडे, सदस्या नीता निकोडे, सामाजिक कार्यकर्ता नाजूका आलाम, जानाला येथे सरपंच रंजना भोयर, सामाजिक कार्यकर्ते धनराज रामटेके,, सदस्य विनायक निकोडे, शाळेच्या मुख्याध्यपिका कुंदा डफाडे, शिक्षिका आशा बुरडकर, फुलझारी येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक परमानंद कुंभारे, शिक्षिका पुष्पा  कोटनाक्के, कान्तापेठ येथे शाळेच्या मुख्याध्यपिका इंदू गुरुनुले, शिक्षिका स्मिता अवचट, माहाडवाडी  येथे मुख्याध्यापिका शर्मिला डहाके यांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि,  शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही तर देशाचे भवितव्य घडवत असतो. म्हणून शिक्षकाचे स्थान सर्वोच्च आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येक अडचणींना तोंड देत विद्यार्थी दशेत मुलांनी सतत उपक्रमशील ठेवत असतो. तसेच विद्यार्ध्यांनी आयुष्यात प्रगतशील रहावे स्वतः बरोबर समाज तसेच राष्ट्राची उन्नती साध्य करण्याचे ध्येय ठेवावे, असेही वैशाली निकोडे म्हणाल्या.

वरील सर्व शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्ता नाजूका आलाम यांनी शाळांना पुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये