ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होळीमध्ये विक्री करीता आणलेला विदेशी दारू 3 लाख 57 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 13.03.2025 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस यांना गोपनिय माहीती मिळाली वरून आरोपी नामे अमीत उर्फ पिटु अग्रवाल रा. समर्थ वाढी कां ता. जि. वर्धा यांचेवर प्रोव्हीशन रेड केला असता त्यास पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पसार झाला कमला नर्सीग होम इंदीरा माकेर्ट रोड चे बाजुला 1) एक जुनी वापरती सिलवर रंगाची मारूती कंपनीची अल्टो चारचाकी वाहन क्र एम.एच 29 जे 0667 व त्या मधुन दोन खरड्याचे खोक्यात बडवाईझर व कार्सबर्ग कंपनीची 48 टिन कॅन व 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला शिश्या तसेच त्यांची मानस मंदीर वर्धा येथे त्यांचे किरायाचे खोली मधुन 1) 180 एम.एल.च्या रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 30 सिलबंद शिश्या 2) 375 एम.एल.च्या रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 10 सिलबंद शिश्या 3) 750 एम.एल.च्या रॉयल स्टेंग डबल डार्क कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 2 सिलबंद शिश्या 4) 750 एम.एल. च्या रॉयल स्टॅग डयुलेक्स विस्की कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 2 सिलबंद शिश्या 5) 750 एम.एल.च्या आयकानिक व्हाईट कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 2 सिलबंद शिश्या 6) 180 एम.एल.व्या मॅजिक मुमेट ग्रेन ओडका कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 4 सिलबंद शिश्या 7) 180 एम.एल.च्या मॅजिक मुमेंट रोनिक्स कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 5 सिलबंद शिश्या 8) 180 एम.एल.च्या ऑक्समिय कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 5 सिलबंद शिश्या प्रती असा एकुन जु. की. 3,57,900/- रु चा माल बिनापास परवाना अवैधरित्या मिळुन आल्याने जागीच मौक्का जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अमीत उर्फ पिंटु अग्रवाल रा. समर्थ वाडी वर्धा ता. जि. वर्धा यांचे विरुध्द 1) अपराध क्रमांक / 2025 कलम 65 ई. 77 अ, म.दा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो. स्टे. वर्धा शहर येथील पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन सा. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी पवन निलेकर, मंगेश चावरे, समीर शेख यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये