ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुष्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत स्वरसाधना करेन – जयंत देऊरकर

यशाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी कलाकारांनी प्रयत्नांची शर्थ करावी - रविंद्रजी भागवत

चांदा ब्लास्ट

गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच गुरुपौर्णिमा उत्सव : प्रा. पराग धनकर

संस्कार भारती चंद्रपूरचा गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

मी आजवर संगीतासाठी जगलो. संगीत हाच माझा ध्यास आणि श्वास आहे. कलेची निष्ठेने सेवा केल्यास परमानंद मिळतो, तो मिळविण्याचा प्रयत्न मी आजवर केला आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत मी स्वरसाधना करेन असे प्रतिपादन ज्येष्ठ व्हायोलिन वादक श्री जयंत देऊरकर यांनी केले.

संस्कार भारती चंद्रपूरच्या गुरुपौर्णिमा उत्सवात ते बोलत होते. संस्कार भारती चंद्रपूर द्वारे नटराज पूजन व गुरुपूजन सोहळ्याचे आयोजन स्थानिक लोकमान्य टिळक विद्यालयात करण्यात आले होते. या सोहळ्यात ज्येष्ठ व्हायोलिन वादक श्री जयंत देऊरकर यांचा गुरू या नात्याने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक श्री रविंद्र भागवत, प्रा. पराग धनकर l, संस्कार भारतीच्या अध्यक्ष संध्या विरमलवार यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्री रविंद्र भागवत यांनी मौलिक मार्गदर्शन केले. संस्कार भारती हा केवळ कलाकारांचा मेळा नसून ते कलेच्या माध्यमातून नवा भारत घडविण्यासाठी तयार करण्यात आलेले कलाकारांचे संघटन आहे. या संघटन प्रक्रियेत यश न मिळाल्यास खचून न जाता यशाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी कलाकारांनी प्रयत्नांची शर्थ करावी, असेही श्री भागवत म्हणाले. प्रा पराग धनकर यांनी गुरुचे आपल्या जीवनातील महत्व या विषयावर भाष्य केले. गुरू हा आपल्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, गुरुपूजन करतो. शिक्षकांनी विद्यादानाच्या कार्यापलिकडे जात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिरत गुरूपद प्राप्त करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. गुरू ते सदगुरु हा प्रवास प्रा धनकर यांनी विविध उदाहरणासह आपल्या भाषणातुन प्रभावीपणे मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या विरमलवार यांनी केले.

यावेळी श्री जयंत देऊरकर यांच्या सन्मानार्थ मानपत्राचे वाचन जागृती फाटक यांनी केले तर कविता वाचन अजय धवने यांनी केले. यावेळी २०२३-२४ या वर्षांसाठीची संस्कार भारती चंद्रपूर महानगर शाखेची कार्यकारिणी जिल्हा मंत्री श्री मंगेश देऊरकर यांनी जाहीर केली . पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष डॉ राम भारत यांनी दिला. नटराज पुजना नंतर प्राजक्ता उपरकर आणि चमूने नटराज वंदना शिवस्तुती नृत्याच्या माध्यमातून सादर केली. तर गायक कलावंतांनी गुरुवंदना व संस्कार भारती ध्येयगीत सादर केले . कार्यक्रमाची सांगता सत्कारमूर्ती श्री जयंत देऊरकर यांच्या व्हायोलिन वादनाने झाली. यावेळी त्यांचा नातू अर्णव देऊरकर याने त्यांना साथ दिली तर तबल्याची साथसंगत राम कोडमलवार यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुजीत आकोटकर यांनी केले . स्वरुपा जोशी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती..

संस्कार भारती चंद्रपूर महानगर नवीन कार्यकारिणी २०२३-२४

१) अध्यक्ष : सौ संध्या विरमलवार

२) उपाध्यक्ष : डॉ. राम भारत

३) सचिव : लिलेश बरदाळकर

४)सहसचिव : राम कोडमलवार , सौ .अपर्णा घरोटे

५) मातृशक्ती विधा प्रमुख तसेच प्रांत कुटुंब आयाम प्रमुख : ऍड भावना हस्तक

६) संगीत विधा प्रमुख : प्रवीण ढगे

७) संगीत विधा सहप्रमुख : स्वरूपा जोशी

८) साहित्य विधाप्रमुख : जागृती फाटक

९) नृत्य विधा प्रमुख : कु. प्राजक्ता उपरकर

१०) नृत्य विधा सहप्रमुख सौ. पूनम झा

११) चित्रकला प्रमुख : श्री किरण पराते

१२) भू-अलंकरण विभाग प्रमुख : श्री सुहास दुधलकर

१३) नाट्यविधा प्रमुख : सौ. नूतन धवने

१४) प्रसिद्धी प्रमुख :सौ प्रणाली पांडे

१५) कोषाध्यक्ष : श्री सुजित आकोटकर

१६) कार्यकारिणी सदस्य : पूर्वा पुराणिक

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये