ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाल गोपाल गणेश मंडळ वणी (बू ) ने राबविला मेरी माटी मेरा देश हा उपक्रम

माजी उपसभापती महेश देवकते यांची प्रमूख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती तालुक्यातील बाल गोपाल गणेश मंडळ वणी (बू ) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्यासाठी दिल्लीत साकारणाऱ्या अमृतवाटिकेत देशभरातील माती एकत्रित करण्याचे आव्हान केले आहे.

त्यांच्या या आव्हानाला साथ देत बाल गोपाल गणेश मंडळ वणी ( बू ) यांनी मेरी माटी मेरा देश हा उपक्रम त्यांच्या मंडळाच्या मार्फतीने एक सुंदरशक कलश ठेवून त्यामध्ये गावातील अनेक घराघरातून महिलांनी माती आणून त्या कलश मध्ये टाकून त्या कलशाचे पूजन केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण बालगोपाल गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये