ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा येथील आषाढी एकादशीच्या प्रशासकीय महापूजेचे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निमंत्रण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीसंत नरहरीनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे मागील चार वर्षांपासून प्रतिवर्षी आषाढी एकादशीचे पर्वकाळी माननीय तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे हस्ते प्रशासकीय महापूजेचे आयोजन करण्यात येते.
या निमित्ताने आज श्रीसंत नरहरिनाथमहाराज सेवा समितीच्या सदस्यांनी तहसीलदार .वैशालीताई डोंगरजाळ यांची भेट घेऊन दिनांक २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचे दिवशी संपन्न होणाऱ्या महापुजेचे निमंत्रण दिले.
यावेळी सेवा समितीचे सदस्य सर्वश्री पंडितराव पाथरकर, संमती जैन, विजुभाऊ उपाध्ये , बळीराम मापारी मामा, प्रकाश खांडेभराड , प्रकाश अहिरे , खरात साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.



