ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री महर्षी सुदर्शन महाराज जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेटच्या वतीने शितपेयाची व्यवस्था

चांदा ब्लास्ट

श्री महर्षी सुदर्शन महाराजजी यांच्या जयंतीनिमित्त सुदर्शन समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शोभायात्रेचे गंजवार्ड चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
   यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथेयूवा नेते अमोल शेंडेअंकुश आमटेप्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवारराज हजारेइमरान शेखनितेश गवळीकरणसिंह बैसराहूल खाडे आदींची उपस्थिती होती.
   दरवर्षी प्रमाणे यंदा ही सुदर्शन समाजाच्या वतीने श्री महर्षी सुदर्शन महाराज जंयती निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दादमहल वार्ड  येथील श्री सुदर्शन महाराज मंदिर येथुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत. जटपूरा गेटला वळसा घालुन कुस्तुरबा मार्गे पुन्हा सुदर्शन महाराज मंदिर येथे पोहचली. यावेळी गंजवार्ड येथे या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच तयार करण्यात आला होता. सदर शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत करत श्री महर्षी सुदर्शन महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेटच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या शोभायात्रेत शेकडो समाज बांधव उपस्थित झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये